scorecardresearch

Premium

“आईवर ओरडू नका”; पालकांच्या भांडणात चिमुकलीने घेतली धाडसी भूमिका, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली पालकांच्या भांडणादरम्यान एक धाडसी भूमिका घेते. या व्हिडीओमुळे मुलांचे भावविश्व, त्यांच्या आसापासचे वातावरण याकडे लक्ष वेधत आहे.

Young girls brave stand against parents’ conflict amazes social media
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली पालकांच्या भांडणादरम्यान एक धाडसी भूमिका घेते. (फोटो सौजन्य todayonline, इंडियन एक्स्प्रेस)

अनेकदा पालकांच्या वादामध्ये लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होतोय याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर खूप परिणाम होत असतो. अशाच स्थितीत असलेल्या एका चिमुकलीने तिच्या पालकांच्या भांडणात हस्तक्षेप केला आणि तिची भुमिका स्पष्टपणे मांडली आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली वयाने अगदी लहान असूनही ती अत्यंत हुशार आणि समजुदार असल्याचे दिसते.

नुकताच चीनच्या झेजियांग प्रांतातील एका चिमुकलीचा व्हिडीओ @todayonline या इंस्टाग्राम अकाउंवर पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र ही या चिमुकलीचे नेटकरी कौतूक करत आहे कारण ती तिच्या पालकांमधील वादात निर्भयपणे हस्तक्षेप करते आणि तिच्या प्रतिक्रयेवरून ती वयापेक्षा जास्त समजुदार असल्याचे दिसते.

nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
women tehsildars car chased by bikers in jalgaon
चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो
former president jair bolsonaro marathi news, jair bolsonaro latest news in marathi, brazil latest news in marathi
विश्लेषण : ब्राझीलचे माजी अध्यक्ष ‘ट्रम्पभक्त’ जाइर बोल्सोनारो पुन्हा अडचणीत? वर्षभरापूर्वी केलेला बंडाचा प्रयत्न किती भोवणार?

हेही वाचा – पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये सीटची उशी झाली गायब! एअरहोस्टेस म्हणाली, “सीट खाली शोधा”

व्हिडिओमध्ये लहान मुलगी शांतपणे तिच्या वडिलांना सांगते आणि तिच्या आईच्या मेहनतीचा आदर करणे महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओमध्ये चिमुकली तिच्या वडीलांना समजावते की, “आईवर ओरडू नका. जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा आई तुम्हाला विचारते ना, काय झाले? तुम्ही आम्हाला शांत बसण्यास सांगता. तुम्हाला तुमच्या मनावरील ओझे आईबरोबर वाटून घ्यायचे नसेल तर तुमच्या नकारात्मक भावना घरी घेऊन येऊ नका. जेव्हा तुमचा मूड खराब आहे हे पाहिल्यावर आम्ही एक शब्दही बोलण्याची हिंमत दाखवत नाही. आम्ही लहान मुले असल्यामुळे आम्हालाही भिती वाटते. आम्हाला माहित आहे की तुम्ही खूप कष्ट करता. पण कोण कष्ट करत नाही? आई सुद्धा कष्ट करत नाही का? तुम्ही आम्हाला कुटुंबासारखी वागणूक द्या जेणेकरून आपण चांगल्याप्रकारे संवाद साधू शकतो. आपण एकमेकांचे शत्रू नाही.” असे ती ठामपणे सांगते आणि तिच्या बोलण्यावरून तिच्या वयापेक्षा जास्त समजुदारपणा तिच्याकडे आहे हे दिसून येते.

इंस्टाग्रामवर लोक या मुलीच्या धाडसाची आणि शहाणपणाची प्रशंसा करत आहे. एकाने लिहले, “ती एक धाडसी मुलगी आहे आणि शांतपणे बोलण्यास घाबरत नाही,” तर दुसर्‍याने सहमती व्यक्त करत म्हणाले, “खरे आहे, ती सुंदर आहे आणि तिचा प्रत्येक शब्द बरोबर आहे.”

हेही वाचा – धनुषच्या ‘Rowdy Baby’ गाण्यावर तरुणीने केला भन्नाट डान्स! व्हिडीओ पाहून साई पल्लवीची येईल आठवण!

तिसरा म्हणाला “ही कोणत्याही कठोर व्यक्तीचे मन वळवू शकते. व्वा! अत्यंत बुद्धिवान. जग आता मुलांची एक नवीन पिढी जन्माला घालत आहे जी आपल्याला संवाद कसा साधायचा हे दाखवत आहे.”

हृदयस्पर्शी व्हिडिओ ही आठवण करून देतो की, “कधीकधी सहानुभूती आणि समजूतदारपणाचा धडा सर्वात लहान व्यक्तीकडून मिळतो”.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young girls brave stand against parents conflict amazes social media snk

First published on: 28-11-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×