Premium

Youngest Weightlifter : OMG! आठ वर्षाची चिमुकली उचलते चक्क ६० किलोचं वजन, नेटकरी म्हणतात, “ही तर दुसरी मीराबाई चानू”

आठ वर्षाच्या वेट लिफ्टरला पाहिलं का? साठ किलोचं उचलते वजन; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Youngest Weightlifter 8 years old haryana girl arshia goswami video goes viral of deadlifting 60 kg
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आठ वर्षाची चिमुकली साठ किलोचं वजन उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होणार. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असून ती हरियाणा रहिवासी आहे. ती देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर आहे. आठ वर्षाच्या वयात ४५ किलो वजन उचलणारी यंगेस्ट वेटलिफ्टर म्हणून तिने आधीच रेकॉर्ड बनवला आहे. आता तिचा ६० किलोचं वजन उचलणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हेही वाचा : किळसवाणा प्रकार! रेस्टॉरंटमधील जेवणात कर्मचारी थुंकला? व्हायरल Video पाहताच नेटकरी संतापले

अर्शियाचे स्वप्न

अर्शियाचे प्रेरणास्थान मीराबाई चानू असून त्यांच्याप्रमाणेच अर्शियाला देशासाठी सुवर्णपदक जिंकायचं आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. अर्शियाचे वडील फिटनेस ट्रेनर आहेत. अर्शियाला वेट लिफ्टिंगशिवाय पॉवरलिफ्टिंग आणि तायक्वांडोमध्येही आवड आहे.

हेही वाचा : फायनल मॅचच्या आधी फॅन्सचा धोनीला स्पेशल मेसेज, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक; Video Viral

नेटकऱ्यांकडून अर्शियाचे कौतुक

अर्शियाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. अनेकांनी तिच्या या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक केलं आहे. अर्शियाचे आईवडील सोशल मीडिया अकाउंटवर अर्शियाचे व्हिडीओ शेअर करत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youngest weightlifter 8 years old haryana girl arshia goswami video goes viral of deadlifting 60 kg ndj

First published on: 28-05-2023 at 16:32 IST
Next Story
किळसवाणा प्रकार! रेस्टॉरंटमधील जेवणात कर्मचारी थुंकला? व्हायरल Video पाहताच नेटकरी संतापले