YouTube new rules: यूट्यूब आता आपल्या कमाईच्या धोरणात (monetization policy) एक मोठा बदल करत आहे, ज्यामुळे सतत तेच तेच किंवा AI द्वारे तयार केलेले व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. हा बदल १५ जुलैपासून लागू होणार आहे. पुनरावृत्ती कंटेंट’ ओळखण्यासाठी आणि तपासण्यासाठी आपल्या मॉनिटायझेशन धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ‘ओरिजिनल’ आणि ‘ऑथेंटिक’ कंटेंट अपलोड करण्याची मागणी क्रिएटर्सनी नेहमीच केली आहे, असे कंपनीने अधोरेखित केले, त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या कमाई धोरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणाला सर्वात जास्त धोका आहे?

जे क्रिएटर्स ऑटोमेटेड व्हिडीओंवर जास्त अवलंबून असतात त्यांना याचा फटका बसू शकतो. यामध्ये एआय व्हॉइसओव्हर वापरणारे चॅनेल, बेसिक स्लाईड शो व्हिज्युअल किंवा थोड्याफार फरकासह पुन्हा पुन्हा त्याच फॉरमॅटचे अनुसरण करणारे व्हिडीओ समाविष्ट आहेत. हे प्रकार विशेषतः यूट्यूब शॉर्ट्समध्ये सामान्य झाले आहे आणि काही अहवालांनुसार आता ४० टक्क्यांहून अधिक शॉर्ट्समध्ये काही प्रमाणात एआय समाविष्ट आहे. यूट्यूब एआयवर बंदी घालत नाही, परंतु ते एक स्पष्ट संदेश पाठवत आहे. जर तुमचा मजकूर कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नाशिवाय किंवा क्रिएटीव्हीटीशिवाय मशीनने बनवला आहे असे वाटत असेल, तर ते आता कमाईसाठी पात्र ठरणार नाही.

कोण सुरक्षित आहे?

जर तुम्ही तुमच्या व्हिडीओंमध्ये दिसत असाल, स्वतःच्या आवाजात बोललात किंवा तुमचे व्यक्तिमत्व आणि कल्पना कंटेंटमध्ये आणत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात. यूट्यूबने स्पष्ट केले की, जे एआयचा वापर करत नाहीत, स्वत: मेहनत घेऊन कंटेट तयार करतात, अशा क्रिएटर्संना याचा फटका बसणार नाही.

म्हणून जर तुम्ही एक्स्प्लेनर कंटेट, ट्युटोरियल्स, प्रतिक्रिया किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ तयार केले, जिथे तुमचा आवाज किंवा तुम्ही स्वत: उपस्थित असाल, तर तुमचा कंटेंट वेगळा दिसण्याची शक्यता जास्त असू शकते. कमाईसाठी मूलभूत आवश्यकता बदललेल्या नाहीत. तुम्हाला अजूनही १,००० सबस्क्राइबर्स आणि गेल्या वर्षात ४,००० तास वॉच टाईम आणि ९० दिवसांत १ कोटी शॉर्ट्स व्ह्युजची आवश्यकता आहे. पण, आता यूट्यूब तुमचा कंटेंट कसा बनवता यावर बारकाईने लक्ष ठेवेल.

YouTube देखील पारदर्शकतेसाठी एक नवीन नियम आणत आहे. आतापासून क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडीओंमध्ये AI-जनरेटेड आवाज, चेहरे किंवा दृश्ये जे प्रेक्षकांना दिशाभूल करू शकतात हे स्पष्टपणे उघड करावे लागेल. जर ते असे करण्यात अयशस्वी झाले तर त्यांचे व्हिडीओ काढून टाकले जाऊ शकतात किंवा त्यांचे अकाउंट डिमॉनेटाइज केले जाऊ शकतात. डीपफेक किंवा तोतयागिरीच्या प्रकरणांमध्ये हे विशेषतः महत्त्वाचे आहे.

कमाई करायची तर मग मेहनत करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

YouTube चा मूळ आणि खरा कंटेंट प्रसिद्ध करण्यावर जोर आहे. हे त्यांचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. कंपनीने नेहमी मॉनेटायझेशन पॉलिसीत सर्वात अगोदर ओरिजिनल कंटेंटची गरज व्यक्त केलेली आहे. जर यूट्यूबवरून कमाई करायची असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कंटेंट क्रिएटर्संना खरा आणि अधिकृत कंटेंट, स्टोरी द्यावी लागेल, असे यूट्यूबने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. एआय टूल्समुळे कंटेंट तयार करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे, परंतु त्याचा चुकीचा वापर करणं योग्य नाही. या अपडेटसह, यूट्यूबचा संदेश स्पष्ट आहे की, तंत्रज्ञानाची मदत घ्या, पण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहून कंटेट तयार करू नका.