टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Mask) हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच ते त्यांच्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जातात. तर आज एलॉन मस्क यांच्यासाठी एका युट्युबरने एक खास गोष्ट भेट म्हणून दिली आहे. एका युट्युबरने १०० दिवसांत टेस्लाची लाकडाची सायबरट्रक (Tesla Cybertruck ) तयार केली आहे आणि एक खास पोस्टदेखील शेअर केली आहे.

टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, तर टेस्ला सायबर ट्रक हा एक इलेक्ट्रिक पिकअप ट्रक आहे. चार वर्षांपूर्वी टेस्लाचे एलॉन मस्क यांनी २०१९ मध्ये हा पिकअप सायबर ट्रक जगासमोर आणला होता. टेस्ला सायबर ट्रकमध्ये ड्युअल मोटार आहे, जी एका चार्जवर ४८२ किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देते. तर एका युट्युबरने लाकडाचा टेस्ला सायबर ट्रक १०० दिवसांत तयार केला आहे आणि एलॉन मस्क यांचे कौतुक करताना एक चिठ्ठी लिहिली आहे. एकदा तुम्हीसुद्धा ही पोस्ट नक्की बघा.

हेही वाचा…जोडप्याने पैसे परत मिळावे म्हणून चक्क अन्नात आपलेच केस घातले! रेस्टॉरंटने शेअर केलेला हा व्हायरल Video पाहा.

पोस्ट नक्की बघा :

१०० दिवसांत तयार केला टेस्लाचा लाकडाचा सायबर ट्रक :

युट्युबरने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रिय एलॉन मस्क… मी एक कन्टेन्ट क्रिएटर आहे, ज्याला लाकडी वाहनांवर खूप प्रेम आहे. एलॉन मस्क आणि टेस्ला दोघांची प्रशंसा करू तेवढी कमी आहे. अनेक वर्षांमध्ये मी अनुभव घेण्यासाठी अनेक लाकडी गाड्या बनवण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच आज मी एक ‘सायबर ट्रक’ तयार केली ; ज्याने मी स्वतः खूप प्रभावित झालो आहे. माझ्या अनेक प्रेक्षकांना आवडणारी अशी ही गाडी आहे. मला माहिती आहे की, टेस्लाने सायबर ट्रकला यश मिळवून देण्याच्या आव्हानांचा सामना केला आहे. तसेच एलॉन मस्क आणि टेस्लाच्या क्षमतांवर माझा अतूट विश्वास आहे. मला आशा आहे की, तुम्हाला आणि टेस्लाला हा लाकडी सायबर ट्रक भेट देण्याचा मान मला मिळेल. एलॉन मस्क आणि टेस्लाला यश मिळावे आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तुमचे स्थान कायम राहावे, अशी मी इच्छा करतो. शुभेच्छा, एनडी-वुडआर्ट ; असे लिहून, कृपया माझे हे पत्र एलॉन मस्क आणि टेस्ला यांना पाठवण्यास मदत करा, असे आवाहनदेखील त्यांनी या पात्रातून केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @NDwoodart या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच या पोस्टवर “नक्कीच, खूप कौतुकास्पद” अशी स्वतः एलॉन मस्कने कमेंट करत या खास गाडीचा स्वीकार केला आहे आणि सोशल मीडियावर ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.