या दोघांनी शुक्रवारी #TeamSeas लाँच केली, जगातील महासागर, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांमधून ३० दशलक्ष पौंड प्लास्टिक आणि कचरा काढून टाकण्यासाठी $30 दशलक्ष जमा करण्यासाठी क्राउडफंडिंग मोहीम सुरु केली आहे. $30 दशलक्ष म्हणजे भारतीय रुपयांचे जवळ जवळ दोन अब्ज पेक्षा जास्त रक्कम होते.मिस्टर बीस्ट (उर्फ जिमी डोनाल्डसन) आणि रॉबर, हे दोघे व्हायरल-व्हिडीओ उस्ताद, चांगले काम करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत: एका योग्य पर्यावरणीय कारणाला पाठिंबा देण्याबरोबरच, ते त्यांचे प्रेक्षक सपोर्ट वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

TeamSeas ची घोषणा करणार्‍या व्हिडीओमध्ये, मिस्टर बीस्ट खूप कचरा असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवरील ६०,००० पौंड कचरा साफ करण्यासाठी तयार आहे . “प्रत्येक एक डॉलरसाठी तुम्ही दान करा… एक पौंड कमी कचरा समुद्रात असेल,” तो म्हणतो.

(हे ही वाचा : Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )

या आधीही केली होती अशीच मोहीम

यापूर्वी, मिस्टर बीस्ट आणि रॉबर यांनी २०१९ मध्ये आर्बर डे फाउंडेशनच्या भागीदारीत सर्वात मोठ्या निर्मात्याच्या नेतृत्वाखालील निधी उभारणी मोहिमेपैकी एक, #TeamTrees लाँच करण्यासाठी भागीदारी केली होती. २० दशलक्ष झाडे लावण्यासाठी $२० दशलक्ष उभे करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते आणि त्यामुळे एकूण १ अब्जाहून अधिक व्हिडीओ व्ह्यूज निर्माण होऊन $२३ दशलक्ष पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. दोन वर्षांनंतर, teamtrees.org ला अजूनही दररोज २,६००झाडे लावण्यासाठी पुरेशी देणगी मिळत आहे.