सध्या देशभर अनेक ठिकाणी ‘लम्पी स्कीन’ आजाराचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधीय शेकडो गायींचा मृत्यू झाला आहे. या आजारावर नियंत्रण ठेण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी राजस्थानमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश सिंह रावत विधानसभेत गाय घेऊन आले होते. पण त्यांच्यासोबत भलताच प्रकार घडला आहे.

विधानसभेच्या आवारात पोहोचण्यापूर्वीच रावत यांनी आपल्यासोबत आणलेली गाय पळून गेली आहे. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

हेही वाचा- “याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल!

भाजपा आमदार सुरेश सिंह रावत विधानसभेच्या गेटबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गळ्यात दोरी बांधलेली गाय त्यांनी सोबत आणली होती. मात्र, पुढच्याच क्षणात गाय पळून गेली आहे. यावेळी गायीची दोरी पकडलेल्या व्यक्तीला गायीने ओढत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियात नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रावत म्हणाले की, राज्यात ‘लम्पी स्कीन’ संसर्गाने गायींना ग्रासलं आहे, मात्र राज्य सरकार अद्याप गाढ झोपेत आहेत. या रोगाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी विधानसभा परिसरात गाय आणली होती.