KBC 13 ला मिळाला दुसरा करोडपती, ७ कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देणार हा स्पर्धक?

‘कौन बनेगा करोडपती १३’चा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

kaun banega crorepati 13,
'कौन बनेगा करोडपती १३'चा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहते. मात्र, काही मोजक्याच स्पर्धकांचे हे स्वप्न पूर्ण होते. नुकताच शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ एका स्पर्धकाला ७ कोटी रुपयांचा प्रश्न विचारतात.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत अमिताभ स्पर्धकाला पहिले १ कोटी रुपयांचा प्रश्न विचारतात. त्याचे उत्तर देत तो स्पर्धक १ कोटी रुपये जिंकतात. या प्रश्नाचे उत्तर देत कौन बनेगा करोडपतीला आणखी एक करोडपती मिळाला आहे. त्यानंतर अमिताभ त्यांना ७ कोटी रुपयांचा प्रश्न विचारतात.

आणखी वाचा : Bigg Boss 15 : “नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

हा एपिसोड २० आणि २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता हा स्पर्धक ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देत ७ कोटीचा जॅकपॉट जिंरणार का? आता पर्यंत कौन बनेगा करोडपती १-१ कोटी जिंकणारे दोन स्पर्धक ठरले आहेत. तर आग्राच्या शिक्षिका हिमानी बुंदेल या एकमेव अशा स्पर्धक आहेत, ज्यांनी १५ व्या प्रश्नाचे अचुक उत्तर देत १ कोटी रुपये जिंकले. आता पर्यंत एकाही स्पर्धकाने ७ कोटी रुपये जिंकलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kaun banega crorepati 13 this contestant wins rs 1 crore to crack 7 crore jackpot question watch promo dcp

ताज्या बातम्या