Bigg Boss 15 : “नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान

‘बिग बॉस १५’च्या ‘विकेंड का वार’चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

salman khan, afsana khan, bigg boss 15,
'बिग बॉस १५'च्या 'विकेंड का वार'चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सध्या ‘बिग बॉसचे १५’ वे पर्व सुरु आहे. सध्या शोमध्ये असलेली स्पर्धक अफसाना खान तिच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. नेटकरी तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. दरम्यान, सलमान खाननेही अफसानावर टीका केली. मात्र, त्याचवेळी अफसाना असे काही बोलली की सलमानला प्रचंड राग आला. विकेंड का वारचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस’चा हा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं आहे की सलमान अफसानाला खूप ओरडत बोलतो, “निर्लज्ज बाई कोण आहे आणि कोण नाही हे तू ठरवणार?” त्यावर अफसाना बोलते, “तुम्ही मोठे आहात.” अफसानाला मध्ये थांबवत सलमान बोलतो नाही “नाही मी पण म्हातारा आहे.”

आणखी वाचा : “डिलिव्हरीच्या वेळी ऐश्वर्याने…”; अमिताभ यांनी केलेला तो खुलासा

आणखी वाचा : “जरा दोन दिवस…”, ऋतुराजच्या सामन्या आधी नेटकऱ्यांनी सायलीला दिला सल्ला

यावर स्पष्टीकरण देत अफसाना म्हणाली, “मी रागात होते.” पण सलमान तिचं ऐकत नाही आणि बोलतो, “रागात काहीही बोलणार? तुझं तोंड तर चालत त्यासोबत हात पण चालतात. तुझा एक सेट पॅटर्न आहे.” सलमानच्या या वक्तव्यांवर इतर स्पर्धक होकार देतात. शमिता बोलते की “अफसाना आधी दोष देते आणि नंतर स्वत: ला इजा करते.” इतर स्पर्धकांकडून अफसाना बद्दल ऐकल्यानंतर सलमान बोलतो, “माझी चॉइस असती तर मी तुला या शोमधून काढून टाकलं असतं.” हे ऐकल्यानंतर अफसाना माफी मागण्या ऐवजी बोलते, “मला काहीच अडचण नाही.” हे ऐकल्यानंतर सलमानला राग येतो. आता सलमान पुढे काय करणार? अफसाना सलमानची माफी मागेल की ती शो बाहेर जाईल ही आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 15 salman khan bashes afsana khan says if he had a choice he would have eliminated her dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या