‘तुझ्यात जीव रंगला’मधील कलाकारांची करोना चाचणी; लवरकच शूटिंग होणार सुरु?

‘तुझ्यात जीव रंगला’मधील कलाकार कोल्हापुरमध्ये दाखल

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत होते. अनेक कलाकार आणि कामगार बेरोजगार झाले होते. या आर्थिक नुकसानातून बाहेर येण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचेही चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. तिथे त्यांची करोना चाचणी देखील घेण्यात आली. या सर्व मंडळींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना सात दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. यानंतर पुन्हा एकदा या सर्व कलाकारांची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान या मालिकेचे चित्रिकरण सोमवारपासून सुरू होऊ शकते. म्हणजेच लवकरच प्रेक्षकांना राणा दा आणि पाठक बाईंचा रोमान्स पाहता येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tujhyat jeev rangala shooting will start next week mppg

ताज्या बातम्या