करोना विषाणूने संपूर्ण देशात पाय पसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटीदेखील करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मालिकेतील मोहेना कुमारी हिला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्यावर ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र सध्यस्थितीला मोहेना करोना पॉझिटिव्ह असतानाही ती घरी परतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहेना कुमारीला करोनाची लागण झाल्याची माहिती तिने स्वत: चाहत्यांना दिली होती. त्यानंतर तिच्यावर ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास १० दिवस उपचार घेतल्यानंतर मोहेना घरी परतली आहे. विशेष म्हणजे करोनाच्या विळख्यातून पुर्णपणे बरी झालेली नसतानाही ती घरी परतली आहे.

“मी घरी आले आहे, मात्र अद्यापही माझा करोना पूर्णपणे बरा झालेला नाही. मी आताही करोना पॉझिटिव्हचं आहे. परंतु आम्ही आयसोलेशनमध्ये आहोत. आमचा रिपोर्ट निगेटिव्ह यायला किती वेळ लागेल याची काहीच कल्पना नाही. गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात होते. त्याच्या ५ दिवसांपूर्वी आम्हाला करोनाची लागण झाली होती. सगळ्यांना बरं होण्यासाठी काही दिवस लागतील. पण आम्ही सगळे यावर यशस्वीरित्या मात करु”, अशी पोस्ट मोहेनाने लिहिली आहे.

पुढे ती म्हणते, “जोपर्यंत आम्ही या विषाणूला हरवत नाही, त्याच्यावर मात करत नाही तोपर्यंत आम्ही काटेकोरपणे नियमांचं पालन करणार आहोत. आता आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पहिल्यापेक्षा स्ट्रॉग आहोत. आमच्या सगळ्यांची साथ देण्यासाठी मनापासून आभार.”

दरम्यान, मोहेना कुमारीने घरी आल्यानंतर इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ही माहिती दिली. यापूर्वी तिने रुग्णालयात असताना एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने तिचा रुग्णालयातील अनुभव शेअर केला होता. मोहेना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. सतपाल यांना करोना विषाणूची लागण झाली होती. परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये मोहेनासह आणखी १७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress mohena kumari has returned home from the hospital despite still being covid 19 positive ssj
First published on: 14-06-2020 at 08:56 IST