-ही उदाहरणे सोडवताना खालील सूत्र लक्षात ठेवावे.
जर एक टाकी भरण्यासाठी A या नळाला X तास लागत असतील व B या नळाला Y तास लागत असतील व जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी
XY
(A + B) = ——- तासात भरेल.
X + Y
-जर नावेचा संथ पाण्यातील वेग ताशी X किमी इतका असेल व प्रवाहाचा वेग Y किमी / तास तर
* प्रवाहाच्या दिशेने वेग (Downstream), D = X + Y किमी/ तास
* प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग (Upstream), U = X – Y किमी/तास
D + U
* नावाचा संथ पाण्यातील वेग = ———– किमी/तास
2
D – U
* प्रवाहाचा वेग = ————- किमी/तास
2
सरावासाठी उदाहरणे :
= एका नळाने टाकी २४ तासांत भरते आणि दुसऱ्या नळाने ती टाकी ४० तासांत रिकामी होते. जर दोन्ही नळ एकदम सुरू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल?
१) ३० तास २) ४० तास
३) ५० तास ४) ६० तास
स्पष्टीकरण : एक नळ टाकी भरतो व दुसरा नळ टाकी रिकामी करतो म्हणून खालील सूत्र वापरावे.
XY
टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ = ———– तास.
Y- X
24 40 960
= ————– = ———- = 60 तास लागतील.
40 – 24 16
= एका नळाने पाण्याची टाकी ८ तासांत भरते. दुसऱ्या नळाला टाकी रिकामी करायला १२ तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल?
१) २४ तास २) २५ तास ३) २६ तास ४) २७ तास
स्पष्टीकरण : टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ =
८ x१२ ९६
= ———– = ——- = २४ तास.
१२ – ८ ४
= पाण्याची टाकी भरायला ३० तास लागतात. मात्र, टाकीला छिद्र पडल्याने ती टाकी २० तास उशिरा भरते, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती टाकी किती तासांत पूर्ण रिकामी होईल?
१) ७० तास २) ७५ तास ३) ७८ तास ४) ९० तास
स्पष्टीकरण : वरील पद्धतीचे उदाहरण सोडवण्यासाठी खालील सूत्र लक्षात ठेवावे. तो नळ ती टाकी ३० तासांत भरतो, म्हणून X माना, X = ३०. मात्र छिद्र असल्या कारणाने ती टाकी २० तास उशिरा भरते म्हणून Y = २० माना.
X (X + Y)
सूत्र : टाकीला रिकामे होण्यासाठी लागणारा वेळ = —————-
Y
३० (३० + २०)
= ——————-
२०
= ७५ तास
= पाण्याची टाकी भरायला १० तास लागतात. मात्र, टाकीला छिद्र पडल्यामुळे ती ४ तास उशिरा भरते. टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती टाकी किती तासांत पूर्ण रिकामी होईल?
१) ३५ तास २) ४० तास ३) ४५ तास ४) ४५ तास
स्पष्टीकरण : X = १० Y = ४
X (X + Y)
सूत्र : टाकीला रिकामे होण्यासाठी लागणारा वेळ = —————-
Y
१० (१० + ४)
= ———————-
४
= ३५ तास
= समान व्यासाच्या ५ नळांनी पाण्याची टाकी पूर्ण भरायला
२० तास लागतात. जर त्यापकी फक्त ४ नळ सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल?
१) २५ तास २) ३० तास ३) ३५ तास ४) ४० तास
स्पष्टीकरण : M1 = v T1 = sq M2 = u T2 = ?
W1 = W2
M1T1 M2T2
——- = —————
W1 W2
5 ´ 20 = 4 ´ T2
100
—– = T2
4
T2 = 25
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2015 रोजी प्रकाशित
यूपीएससी : नळ, टाकी व प्रवाह यासंबंधी उदाहरणे
जर एक टाकी भरण्यासाठी A या नळाला X तास लागत असतील व B या नळाला Y तास लागत असतील व जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी

First published on: 22-03-2015 at 04:12 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc competitive examination loksatta competitive examination guidance