अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची आणि शिक्षणसंस्थांची माहिती-
अन्नप्रक्रिया उद्योगाची वाढ आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर होत असून या अन्नपदार्थाची निर्मिती, सुरक्षितता, पॅकेजिंग, संशोधन अशा कामांसाठी तज्ज्ञांची गरज मोठय़ा प्रमाणावर भासते. फूड टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठीसुद्धा हे अभ्यासक्रम
उपयुक्त ठरू शकतात.
* इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
बीटेक्. इन फूड इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी : प्रवेशजागा- १६. खएए-टअकठ परीक्षचे गुण आणि बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर प्रवेश मिळतो. प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाते. अर्हता- पहिल्याच प्रयत्नात बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात सरासरीने ३०० पैकी १५० गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई- ४०००१९. वेबसाइट- http://www.ictmumbai.edu.in
ई-मेल- admissions@ictmumbau.edu.in
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रेन्युअरशिप अॅण्ड मॅनेजमेन्ट
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेतील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
पदवी अभ्यासक्रम : बीटेक्. इन फूड प्रोसेसिंग इंजिनीअरिंग. कालावधी- चार वर्षे. प्रवेशजागा- १८० (९० जागा खुल्या संवर्ग, इतर मागासवर्ग ४९, अनुसूचित जाती २७, अनुसूचित जमाती १४) हा अभ्यासक्रम केल्यानंतर अन्नप्रक्रिया अभियंते, पोषण आहारतज्ज्ञ, खाद्यान्ने उद्योजक, अन्न सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अन्न विश्लेषक, गुणवत्ता नियंत्रक अधीक्षक, अन्न घटक व्यवस्थापक, उत्पादने विकास संशोधक, अन्न घटक नियंत्रक विशेषज्ञ, रिटेल साखळी व्यवस्थापक आदी करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्हता- भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांसह बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा केमिस्ट्री यांपैकी कोणत्याही एका विषयात बारावी विज्ञान परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE- MAIN (JOINT ENTRANCE EXAMINATION- MAIN) या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य़ धरले जातात.
अर्ज व माहितीपत्रकन http://www.niftem.ac.in या वेबसाइटवर असून त्याची प्रिंट काढून अर्ज भरून २५० रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसोबत पाठवावा. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांनी १२६ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवावा. रजिस्टर पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवावा लागेल. २० जून २०१४ पर्यंत अर्ज ऑनलाइन भरता येईल. पत्ता- अॅडमिशन सेल, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अॅण्ड मॅनेजमेन्ट, प्लॉट नंबर ९७, सेक्टर ५६, एचएसआयआडीसी, इन्डस्ट्रिअल इस्टेट, कुन्डली – १३१०२८, जिल्हा- सोनपत, हरयाणा.
ईमेल- admission@niftem.ac.in
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी
केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या या या संस्थेत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू आहे. अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह बारावी उत्तीर्ण. कालावधी- ४ वर्षे. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. प्रवेशजागा- ४०. प्रवेश बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील सरासरी गुणांवर दिला जातो.
प्रवेशप्रक्रिया- या अभ्यासक्रमाला खएए-टअकठ मध्ये मिळालेल्या गुणांवर प्रवेश दिला जातो. हा प्रवेश देताना बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज आणि खएए- टअकठ च्या गुणांना ६० टक्के वेटेज दिले जाते. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, पुदूकोट्टल रोड, तंजावर- ६१३००५. तामिळनाडू, ईमेल- academic@iicpt.edu.in वेबसाइट- http://www.iicpt.edu.in
या अभ्यासक्रमासाठी १३ जून २०१४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्जाचे शुल्क- ६०० रुपये. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी शुल्क ३०० रुपये आहे. या रकमेचा डिमांड ड्राफ्ट डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, तंजावर या नावे पाठवावा लागेल.
* बी.एस. अब्दुर रहमान युनिव्हर्सिटी बीटेक्. इन फूड बायोटेक्नॉलॉजी.
कालावधी- चार वर्षे. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. पत्ता- बी.एस. अब्दुर रहमान इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, वंदालूर, चेन्नई- ६०००४८.
वेबसाइट- http://www.bsauniv.ac.in , ईमेल- admissions@bsauniv.ac.in
इतर संस्था
* युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाची स्थापना १९९४ साली करण्यात आली. जळगाव रेल्वे आणि बस स्थानकापासून हे महाविद्यालय दीड किलोमीटर अंतरावर आहे. प्रवेशजागा – १५. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध. पत्ता- पोस्ट बॉक्स नंबर ८०, उमाविनगर, जळगाव- ४२५००१. संस्थेची वेबसाइट- http://www.nmu.ac.in
ई- मेल- profsm@rediffmail.com
* युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, औरंगाबाद
या संस्थेत फूड टेक्नॉलॉजी या शाखेत १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात ५ मुलांना आणि ५ मुलींना प्रवेश दिला जातो. पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद.
संस्थेची वेबसाइट- http://www.bamu.net
ई-मेल- udctaurangabad@yahoo.com.in
* डिपार्टमेन्ट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर
कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून आणि बस स्थानकापासून हे महाविद्यालय तीन किलोमीटर अंतरावर आहे. या संस्थेत फूड टेक्नॉलॉजी या शाखेमध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात ४० मुलांना आणि ४० मुलींना प्रवेश दिला जातो. पत्ता- विद्यानगर, कोल्हापूर- ४१६००४.
संस्थेची वेबसाइट- http://www.unishivaji.ac.in
ई-मेल- director.tech@unishivaji.ac.in
* युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, अमरावती
या संस्थेची स्थापना १९९४ साली झाली. ही संस्था बडनेरा रेल्वे आणि बस स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. या संस्थेत फूड टेक्नॉलॉजी या शाखेमध्ये १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पत्ता- तपोवनच्या शेजारी, अमरावती. संस्थेची
वेबसाइट- http://www.sgbau.ac.in ई-मेल- reg@sgbau.ac.in
* लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
या संस्थेची स्थापना १९४२ साली करण्यात आली. ही संस्था नागपूर रेल्वे आणि बस स्थानकापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
या संस्थेत फूड टेक्नॉलॉजी या शाखेत १२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. संस्थेच्या वसतिगृहामध्ये ४० मुले आणि ३६ मुलींना प्रवेश दिला जातो. पत्ता- एलआयटी कॅम्पस, भारतनगरच्या विरुद्ध दिशेला, अमरावती रोड, नागपूर- ४४००३३.
वेबसाइट- http://www.litnagpur.info
ई-मेल- rajumankar@rediffmail.com
* फूड टेक्नॉलॉजी, अमिटी युनिव्हर्सिटी
नॉयडा कॅम्पस, अमिटी स्कूल ऑफ इंजिनीयरिंग, सेक्टर- १२५ (उत्तर प्रदेश). प्रवेश प्रक्रिया- वरील सर्व संस्थांच्या प्रवेशासाठी खएए टअकठ आणि १२ वी विज्ञान शाखेतील गुणांचा आधार घेतला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2014 रोजी प्रकाशित
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची आणि शिक्षणसंस्थांची माहिती-
First published on: 05-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food processing technology