भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षांचे करू स्वागत
नवीन वर्षांची नवी ही सुरुवात
‘गुढी पाडवा..’ मनाला तसंच संपूर्ण घराला प्रसन्नता देणारा सण! आपले नवे वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. चित्रा नक्षत्रावरून या महिन्याचे नाव चैत्र असे पडले. वर्षांचा हा पहिला सण, यास ‘चैत्राचा गुढी पाडवा’ असे देखील म्हणतात. भारतीय परंपरेत कोणत्याही चांगल्या कार्याची, उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यातील पहिला आहे ‘गुढी पाडवा’. नव वर्षांच्या स्वागताचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुढीसोबतचे तुमचे छायाचित्र आम्हाला loksatta.express@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवा. सबजेक्टमध्ये ‘गुढी माझ्या घरची’ अवश्य लिहा. निवडक फोटो लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिध्द केले जातील. त्याचप्रमाणे या फोटो अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबूक पेजवरदेखील शेअर केली जाईल. याशिवाय सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबूक पेजवर कव्हर फोटो होण्याचा मान मिळेल.