मित्रांनो, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही प्रश्न अशाब्दिक बुद्धिमत्तेसंबधी विचारले जातात. प्रश्न सोपे असतात, मात्र या प्रश्नांचा सराव केला नाही तर सोपे प्रश्नही चुकण्याची शक्यता जास्त असते.
अशाब्दिक बुद्धिमत्ता : ((Non Verbal Reasoning)
* मालिकापूर्ती : यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. मालिकेतील आकृत्यांतील संबंध जाणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधायची असते.
* समान संबंध : यामध्ये चार आकृत्यांपकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जो संबंध असतो, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीच्या आकृत्यांमधील संबंध पाहायचा असतो. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.
* विसंगत आकृती शोधणे : यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो. त्यापकी एक आकृती वगळता इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्माला अपवाद असणारी आकृती हे आपले उत्तर असते.
* आरशातील प्रतिमा आणि जलप्रतििबब : एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतििबब कसे असेल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
* अपूर्ण आकृती पूर्ण करणे : यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधायचा असतो.
* घन व सोंगटय़ा : यातील प्रश्नांमध्ये मोठय़ा घनास रंगवून लहान घनात तुकडे करणे व सोंगटय़ांच्या स्थितींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
= खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
यूपीएससी : अशाब्दिक बुद्धिमत्ता
मित्रांनो, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही प्रश्न अशाब्दिक बुद्धिमत्तेसंबधी विचारले जातात. प्रश्न सोपे असतात, मात्र या प्रश्नांचा सराव केला नाही तर सोपे प्रश्नही चुकण्याची शक्यता जास्त असते.
First published on: 04-04-2015 at 02:37 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta upsc guidence 03 april