मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाच्या सी सॅट पेपर-२ साठी आपण अभ्यासाला सुरुवात केली असेल. आज आपण या पेपरसाठी आवश्यक असलेल्या बठक व्यवस्था या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी जाणून घेऊयात.
परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मात्र, तितकाच जोखमीचा असा उपघटक आहे. जोखमीचा यासाठी की घाईगडबडीत, प्रश्न व्यवस्थित समजून न घेता या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर उत्तरे चुकण्याची शक्यता असते.
या घटकावर प्रश्न सोडवताना टेबलची रचना विचारली असेल,
तर आपण टेबलभोवती बसलेलो आहोत ही कल्पना करून प्रश्न
सोडवल्यास योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे जास्त सोपे होते.
१) खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
P, Q, R, S, T, व, V आणि W हे एका वर्तुळाकृती टेबलभोवती, मध्याकडे तोंड करून बसले आहेत.P हा T च्या उजव्या बाजूला, दुसऱ्या क्रमावर जो T हा R आणि V च्या शेजारी बसला आहे. S हा P चा शेजारी नाही. V हा U चा शेजारी आहे. Q हा S आणि U यांच्यामध्ये बसलेला नाही, Q हा S आणि S यांच्यामध्ये नाही.
१) खालीलपकी कोण शेजारी बसलेले नाहीत?
१) RV २) UV ३) RP ४) QW
२) V च्या लगेच शेजारी कोण बसलेले आहे?
१) P २) U ३) R ४) T
३) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) P हा U च्या लगेच शेजारी बसलेला आहे.
२) R हा U आणि V यांच्यामध्ये आहे.
३) Q हा W च्या डाव्या बाजूला बसलेला आहे.
४) U हा W आणि S यांच्यामध्ये बसलेला आहे.
४) S चे स्थान काय?
१) U आणि V च्या मध्ये
२) P च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमावर
३) W च्या लगेच उजव्या बाजूला
४) माहिती अपूर्ण आहे.
२) खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
A, B, C, D आणि E हे पाच व्यक्ती एका सरळ रेषेत, दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. तसेच M, N, O, P आणि Q या पाच स्त्रिया पहिल्या ओळीला समांतर असणाऱ्या ओळीत, उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. B हा जो D च्या लगेच डाव्या बाजूला बसलेला आहे. B हा Q च्या विरुद्ध बाजूस आहे. C आणि N हे कर्णाकडे एकमेकांच्या विरुद्ध बाजूस आहेत. (diagonally opposite) E हा O च्या विरुद्ध बाजूस, P हा Q जो च्या लगेच उजव्या बाजूस बसला आहे. ) O जो M च्या लगेच डाव्या बाजूला बसलेला आहे तो D च्या विरुद्ध बाजूस आहे. M हा रेषेच्या एका टोकाला बसलेला आहे.
१) O पासून उजव्या बाजूस तिसऱ्या क्रमावर कोण आहे?
१) Q २) N ३) M ४) B२) जर B हा E च्या जागेवर बसला आणि E हा Q च्या जागेवर बसला आणि Q हा B च्या स्थानावर बसला, तर ड च्या विरुद्ध बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण असेल?
१) Q २) P ३) E ४) D
३) खालीलपकी कोण एकमेकांच्या विरुद्ध टोकावर बसलेले आहेत?
१)EQ २) BO ३) AN ४) AM
४) जर O आणि P, A आणि E तसेच B आणि Q यांनी आपले स्थान बदलले तर P च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमावर असणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या व्यक्तीच्या, उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमावर कोण बसलेले असेल?
१) D २) A ३) E ४) O
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
यूपीएससी : बैठक व्यवस्था
मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाच्या सी सॅट पेपर-२ साठी आपण अभ्यासाला सुरुवात केली असेल. आज आपण या पेपरसाठी आवश्यक असलेल्या बठक व्यवस्था या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी जाणून घेऊयात.

First published on: 14-03-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc loksatta spardha guru 14 march