साहित्य : खारीक- २०५ ग्रॅ., काजू १०० ग्रॅ., बदाम १०० ग्रॅ., खसखस ५० ग्रॅ., कणीक २ वाटय़ा, गूळ आवडीनुसार कमी/ जास्त, मगज बी- अर्धी छोटी वाटी, खोबरे २ वाटय़ा (किसून) भाजून घेणे , तूप.

कृती :  सर्वप्रथम खारीक भाजणे, मग कणीक तुपात भाजणे, मग खसखस भाजणे, काजू व बदाम तुपात तळून गार झाले की पूड करणे. खसखसचीपण पूड करणे. खोबरे किसून, भाजून गार झाले की हाताने चुरा करणे. सर्व एका परातीत मिक्स करणे. मग थोडे तुपात मगज बी तळून त्यात घालणे. गूळ दोन वाटय़ा किसून त्यात मिक्स करणे. (गूळ तुमच्या आवडीनुसार कमी/ जास्त घालणे) सर्व एकजीव करून लाडवाचा आकार देणे. हे पौष्टिक लाडू खूपच सुंदर लागतात.

Lynn Red Bank
व्यक्तिवेध: लिन रेड बँक
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
how to make dahi vada at home recipe
Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

सलाड चटणी क्रॉकी

साहित्य : गाजर १ सर्व किसणे, बिट १, टोमाटो १ बारीक फोडी करणे, कांदा १, काकडी १, काकडी बारीक तुकडे करणे व कांदा बारीक चिरणे, चाट मसाला आवश्यकतेनुसार, बटर आवश्यकतेनुसार, चीज- २ क्यूब, हिरवी चटणी- कोथिंबीर, मिरची १, लसूण २ पाकळ्या, एक चिमूट जिरे, मिरी, साखर, आमचूर सर्व एकत्र करून चटणी करणे. रोजच्या पोळ्यांप्रमाणे २ वाटय़ा कणीक भिजवणे.

कृती : पोळी करून तव्यावर दोन्ही बाजंूनी शेकणे. मग एक बाजूला बटर लावणे. मग हिरवी चटणी लावणे. त्यावर चाट मसाला टाकणे. मग किसलेले गाजर, बीट, टोमाटो, काकडी, कांदा घालणे. मग चाट मसाला परत लावणे. चीज किसून पोळी बंद करून वर-खाली बटरने शेकणे. सॉस व चटणीसोबत खायला देणे.

टीप : गाजर, बीट, टोमाटो, कांदा, काकडी सर्व एकत्र करणे (आयत्या वेळी एकत्र करणे, नाही तर पाणी सुटेल)

कणकेचा लाडू

साहित्य : कणीक २ वाटय़ा, डिंक ५० ग्रॅ., पिठीसाखर १ वाटी, तूप दीड वाटी.

कृती : तुपात कणीक भाजून घेणे (मंद आचेवर). गार झाले की त्यात पिठीसाखर घालावी. डिंक तळून त्यात मिक्स करणे व लाडवाचा आकार देणे. हे लाडू खूपच सुंदर लागतात.

चिजी कॉर्न टोस्ट

साहित्य : कॉर्न (कॉर्न उकडून पाणी निथळून टाकणे) (अर्धा किलो), अर्धी बारीक कुटलेली हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हिंग (फोडणीकरिता); हळद एक छोटा चमचा, २ चीज क्यूब, बटर- आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, लिंबू.

कृती : कॉर्न उकडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेणे. मग तेलात हिंग-मोहरीची फोडणी करून वाटलेले कॉर्न हळद घालून परतणे, मिरची-पेस्ट घालणे, थोडे ड्राय होईस्तवर परतणे. त्यात मीठ, कोथिंबर घालणे. गार झाले की लिंबू पिळणे. मग ब्रेडला बटर लावणे त्यात हे सारण घालणे. वरून चीज किसून दुसऱ्या ब्रेडला बटर लावून बंद करणे. टोस्टरवर शेकणे किंवा तव्यावर वर-खाली भाजून घेणे.

हे चिजी कॉर्न टोस्ट मुलांना खूपच आवडतील.

कॉर्न उपमा

साहित्य : कॉर्न अर्धा किलो, मिरची अर्धी बारीक चिरलेली, कोथिंबीर बारीक चिरलेली सजावटीसाठी, मीठ आवश्यकतेनुसार, ओलं खोबरं सजावटीसाठी, लिंबू, तेल, हळद, साखर.

कृती : कॉर्न उकडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेणे. कढईत हिंग, मोहरी, जिरे घालून कॉर्न, हळद, मिरची सर्व एकत्र करणे. थोडी साखर घालणे, मीठ घालणे, सारण थोडे कोरडे होईपर्यंत परतणे. त्यात मग लिंबू पिळणे. कोथिंबीर-ओल्या खोबऱ्याने सजावट करणे. हा कॉर्न उपमा खूपच चविष्ट लागतो.

सुरेखा भिडे – response.lokprabha@expressindia.com