देखण्या हातातून आलेली नक्षीदार रांगोळी….महाराजांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले कलाकार…आणि भक्तीमत वातावरणात अवघ्या काही क्षणात रंगाने सजलेले रस्ते…हे वारीदरम्यान दिसणारे चित्र आपण अनेक वर्ष पाहातो. मात्र ही रांगोळी रेखाटत असतानाच वारकऱ्यांना आणि उपस्थितांना काही संदेशही मिळाला तर? याच संकल्पनेतून पुढे येत तरुणांनी वारीदरम्यान रांगोळ्या काढण्याचा चंग बांधला आहे.

समर्थ रंगावली ग्रुपमधील सर्व तरूण मुले ही डॉक्टर व इंजिनिअर व व्यासायिक आहेत. आवड व त्याव्दारे समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी हा छंद जोपासला आहे. तसेच आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, सणामध्ये स्वयंस्फूर्तीने रांगोळी काढून आपले योगदान देत आहेत. समर्थ रंगावली ग्रुपतर्फे पालखी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या साकारण्यात येणार आहेत.

रांगोळीमध्ये गालिचा रांगोळी, संस्कार भारतीची रांगोळी, पाण्यावरची व पाण्याखालची रांगोळी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. जनजागृतीपर रंगावाली पायघड्या पालखी मार्गावर काढताना . उदा एडस जनजागृती, स्त्रीभ्रूणहत्या, बेटी बचाव, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा , झाडे जगवा, हुंडा बंदी,नेत्र दान, रक्त दान करा, स्वच्छ भारत , या प्रकल्पावरती काढलेल्या रांगोळ्या लोकप्रिय ठरत आहेत. पांडुरंगाच्या कृपेने येणारी कला आणि वारकरी बांधवांकडून मिळणारे आशिर्वाद यांमुळे या उपक्रमात खऱ्या अर्थाने आनंद मिळत असल्याचे या ग्रुपमधील मुलांनी सांगितले.

rangoli-1

या ग्रुपची महत्त्वाची कामगिरी म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये सलग सोहळा वर्षे आळंदी ते पंढरपूर या अंतरापर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत. आज रंगावाली ग्रुपमध्ये २१ सभासद असून यामध्ये ८ वर्षापासून ते ४० वर्षापर्यंतच्या कलाकारांचा या गुपमध्ये समावेश आहे. पालखी मार्गावर मुख्य चौक, मोठा रास्ता ,पालखी विसावा ,गावाचे प्रवेश दार , पालखी सोहळ्यातील विविध रिंगण अशा महत्वाचा ठकाणी रांगोळी काढून सेवा केली जात असल्याचे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी सांगितले.