लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : वसईच्या बंगली येखील कार्मेलाईट शाळेत शिकणार्‍या शार्वी महंते या विद्यार्थिनीला दहावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळविणारी ती पालघर जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे. भरतनाट्यमचे तिला १४ गुण मिळाल्याने तिला १०० टक्के मिळवता आले.

decreasing students in coaching capital kota
विश्लेषण : ‘कोटा फॅक्टरी’ला घरघर? कोचिंग शहरातील विद्यार्थी संख्या घटण्याची कारणे कोणती?
11th admission process Even after the third regular round 1 lakh students have no college Mumbai
अकरावी प्रवेश प्रक्रिया :तिसऱ्या नियमित फेरीनंतरही १ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही
woman arrested from Delhi for blackmailing students for money pmd
अशी ही बनवाबनवी! विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक
engineering Diploma, meritorious students,
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे गुणवंतांचा ओढा, शंभर टक्के गुण मिळवलेले किती विद्यार्थी?
Case of NEETUG paper leak Four more students arrested in Bihar
बिहारमध्ये आणखी चार विद्यार्थ्यांना अटक; ‘नीटयूजी’ पेपर फुटीचे प्रकरण, पाटणा ‘एम्स’मधील वसतिगृहाच्या खोल्याही ‘सील’
27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
Only two teachers to teach 550 students in Mankhurd
मानखुर्दमध्ये ५५० विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अवघे दोन शिक्षक
State Level II CET for BMS BMS BBA BCA Admission
प्रवेशाची पायरी: बीएमएस/ बीएमएस/ बीबीए/ बीसीए प्रवेशासाठी राज्यस्तरीय द्वितीय सीईटी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल सोमवारी लागला. वसईच्या बंगली येथील कार्मेलाईट शाळेत शिकणार्‍या शार्वी महंते या विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहे. शंभर टक्के गुण मिळविणारी शार्वी पालघर जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.

आणखी वाचा-अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, वसईत दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

शार्वीला एकूण ६ विषयांपैकी ५ विषयात ९६ पेक्षा अधिक गुण मइळाले तर इंग्रजीत ८८ गुण, सोशल सायन्स मध्ये ९७, संस्कृत मध्ये ९९ गुण मिळाले. मात्र तिने भरतनाट्यच्या परिक्षेचे १४ गुण मिळाले होते. त्यामुळे तिच्या गुणांची एकूण टक्केवारी १०० टक्के झाली आहे. ती मागील ७ वर्षांपासून भरत नाट्यम शिकत होती. अभ्यास सांभाळून ती भरतनाट्यमचा सराव करत होती. त्याचा तिला फायदा झाला असे शार्वीची आई समीधाने सांगितले.

शार्वीला आयआयटीत जायचे स्वप्न आहे. त्यासाठी ती इंटिग्रेटेड पध्दतीने महाविद्यालयात प्रवेश घेऊन खासगी शिकवणी वर्ग लावणार आहे. पुढील दोन वर्षे ती जेईईच्या परिक्षेची तयारी करणार आहे.