वसई- वसई विरार महापालिकेत ४ नवीन उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून अतिरिक्त आयुक्तपदी संजय हेरवाडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांची बदली करण्यात आली होती. त्यात वसई विरार महापालिकेच्या ६ तर मिरा भाईंदर महापालिकेतील २ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यामुळे १९ मार्च रोजी वसई विरार महापालिकेतील ६ उपायुक्त आणि एका अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली होती. आता या रिक्त झालेल्या पदांवर नियुक्त्या करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार आता उपायुक्तपदी दिपक झिंजाड, गणेश शेटे, अर्चना दिवे आणि प्रियांका राजपूत या ४ उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त आयुक्तपदी संजय हेरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय हेरवाडे यापूर्वी देखील वसई विरार महापालिकेत कार्यरत होते.

हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

पशुधन विकास अधिकारी असलेले किशोर गवस गेल्या काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेत उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीवर आले होते. नुकतीच त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यात आली होती आणि त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र तरी त्यांची तडकाफडली बदली करून उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांना जानेवारी महिन्यात १ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यांची देखील बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

वसई विरारमधील या अधिकार्‍यांची झाली बदली

किशोर गवस- उपायुक्त, उल्हासनगर महापालिका
चारूशिला पंडीत- उपायुक्त, लातूर महापालिका
संघरत्ना खिल्लारे -उपायुक्त, नवी मुंबई महापालिका
नयना ससाणे – उपायुक्त, भिवंडी निजामपूर महापालिका
पंकज पाटील – सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
तानाजी नरळे – सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिचंवड महापालिका

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

मिरा भाईंदरमधील दोन अधिकार्‍यांची बदली

मारूती गायकवाड उपायुक्त – पनवेल महापालिका
संजय शिंदे – उपायुक्त, पुणे महापालिका

Story img Loader