वसई- मित्राने घेतलेले कर्ज न फेडल्याने आर्थिक अडचणीत सापडेल्या भाईंदर मधील एका व्यापार्‍याने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. गिरीधर सोलंकी असे या मयत व्यापार्‍याचे नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना सोलंकी शनिवारी रात्री मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भाईंदर पुर्वेच्या नवघर परिसरात असलेल्या न्यू चंदन इमारचीत राहणार्‍या गिरीधर सोलंकी (५८) हे व्यापारी रहात होते. नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या सायन येथे राहणार्‍या चंद्रकांत गलाटे (५८) याच्याशी सोलंकी याची मैत्री होती. गलाटे याला वैयक्तिक कामासाठी २५ लाखांची गरज होती. कर्जाचे हप्ते मी फेडतो फक्त कर्ज तुझ्या नावावर घे,अशी गळ त्याने सोलंकी यांना घातली. त्याच्या बोलण्यावर सोलंकी यांनी विश्वास ठेवून स्वत:च्या तसेच आई आणि भावाच्या नावावर २५ लाखांचे कर्ज घेतले. त्यासाठी भाईंदर येथील राहते घर तारण म्हणून ठेवले होते. २०१५ मध्ये गलाटे याने हे कर्ज घेतले होते. सुरवातीला काही हप्ते भरल्यानंतर त्याने हात वर केले. त्यामुळे बॅंकेने सोलंकी यांच्या मागे कर्ज भरण्यासाठी तगादा लावला होता. सोलंकी यांच्या घरावर देखील जप्तीची नोटीस आली होती.

हेही वाचा >>>जूचंद्र येथील रांगोळीकार संजय पाटीलने स्पेनमध्ये साकारली रांगोळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मित्र कर्जाचे हप्त भरत नाही, घरावर जप्ती येईल यामुळे निराश झालेल्या सोलंकी यांनी १५ ऑगस्ट रोजी राहत्या घरात अंगावर सॅनिटाझर टाकून स्वत:ला पेटवून दिले. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नवघर पोलिसांनी दिली. सोलंकी यांच्या आत्महत्येला जबाबदार असणार्‍या चंद्रकात गलाटे (५८) याच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. रविवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे यांनी दिली.