वसई : इमारतीच्या आवारात खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या मुलाचा गाडीच्या धडकेत मृत्यू झाला. विरार पाश्चिमेच्या कामणवाला कुंज इमारतीच्या आवरात ही दुर्घटना घडली. इमारतीत राहणारा रहिवाशी गाडी बाहेर काढत असताना गाडीच्या पुढील चकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.

विरार पश्चिमेच्या विज्ञान उद्यानाजवळ कामणवाला कुंज ही इमारत आहे. या इमारतीत रहाणारे प्रतीक शहा (३५) हे गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास इमारतीच्या आवारातून आपली गाडी ( एम एच ४८ आयसी ८११४) बाहेर काढत होते. त्यावेळी इमारतीच्या आवारात खेळत असलेला मनीष ढकाल हा अडीच वर्षांचा मुलगा गाडीच्या चाका खाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मनीष हा याच इमारतीत काम करणाऱ्या नेपाळी सुरक्षा रक्षकाचा मुलगा आहे.

हेही वाचा – मीरा-भाईंदरमधील १७ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्तांचा निर्णय, सहा जणांवरील कारवाई अंतिम टप्प्यात

हेही वाचा – आणखी २३ तरुणींची तक्रार; ‘एआय तंत्रज्ञाना’ने अश्लील छायाचित्रे तयार केल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी विरार पोलिसांनी प्रतीक शहा यांच्याविरोधात कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कलम कायद्याच्या कलम व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा याचे विरारमध्ये मोबाईलचे दुकान आहे