मयुर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी या वर्षी शहरातील १७ गुंडांना आतापर्यंत तडीपार करण्याचा निर्णय परिमंडळ १ च्या उपायुक्तांनी घेतला आहे. ११ गुन्हेगारांविरोधात ही कारवाई पूर्ण झाली असून उर्वरित सहा जणांवरील कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

मीरा-भाईंदर शहर हे मुंबईला लागून असल्यामुळे गुन्हेगारांना या ठिकाणी आश्रय दिला जात असल्याची प्रतिमा राज्यभरात निर्माण झाली होती. त्यामुळे मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालायच्या स्थापनेपासूनच ही प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. यात प्रामुख्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चाप लावला जात आहे.

हेही वाचा >>> वसई, विरारमध्ये रस्ते अपघातांत वाढ; ७ महिन्यांत ८२ मृत्यू, १३१ जखमी

समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार तडीपारीची कारवाई केली जाते. ज्या व्यक्तींपासून नागरिकांना धोका निर्माण होत होता, तसेच मारामारी, हत्या, काळाबाजार आणि मालमत्तेसंदर्भात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची यादी परिमंडळ १ च्या पोलिसांनी तयार केली. त्यानुसार १७ गुंडांची यादी तयार करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांवर कारवाई करून त्यांना शहरातून हद्दपार करण्यात आले. तर सहा जणांविरोधातील कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उपायुक्त जयवंत बजबळे यांनी दिली आहे. सहा पोलीस ठाण्यांकडून यादी तयारमीरा-भाईंदरासाठी घातक असलेल्या गुन्हेगारांची यादी शहरातील सहा पोलीस ठण्यांत दरवर्षी तयार केली जाते. त्यानुसार या वर्षी देखील ही यादी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून तयार करण्यात आली होती. ही यादी उपायुक्त कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर ती पडताळणीसाठी साहाय्यक पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आली होती. यात उपायुक्त कार्यालयाने संबंधित व्यक्तीला बोलावून त्याला बाजू मांडण्याची संधी दिली होती. परंतु, यात घातक वाटणाऱ्या व्यक्तीवर तडीपारची कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा >>> मीरा रोड रेल्वे स्थानकात रिक्षा

समाजास घातक ठरेल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचाच हा भाग म्हणून तडीपारीची ही कारवाई केली जात आहे. जितक्या अधिक प्रमाणात ही तडीपारी होईल तितक्या प्रमाणात मीरा-भाईंदरमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होईल.  – जयवंत बजबळे, उपायुक्त, परिमंडळ १