भाईंदर : मिरा रोड येथील गोकुळ व्हिलेज येथील ‘श्री गोपाळ लाल ‘मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिरा रोड येथील गोकुळ व्हिलेज परिसरात ‘श्री गोपाळ लालमंदिर ‘मंदिर आहे. या मंदिरात अनेक स्थानिक नगरिक हजेरी लावत असतात. मात्र हे मंदिर सोसायटीच्या आर.जी ( रिक्रेशन गार्डन )जागेवर उभारण्यात आले असल्याचा दावा अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. विकासकाने परस्पर ही जागा धार्मिक संस्थेच्या हाती दिल्यामुळे हा वाद उभा राहिला आहे. त्यामुळे या विरोधात सोसायटीमधील पदाधिकारी बऱ्याच वर्षांपासून महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करत होते. यावर दाद मिळत नसल्याने अखेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यावरून मंदिरामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश न्यालयाने दिले होते.परंतु महापालिकेकडून यावर कारवाई करण्याकडे दिरंगाई केली जात होती.

Municipal Corporation clarifies regarding unauthorized commercial establishments says Construction remains illegal after tax collection
कर आकारणीनंतरही बांधकाम अवैधच; अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai virar latest news in marathi,
वसई : अनधिकृत इमारतीवर कारवाईच्या वेळी तणाव, शेकडो नागरिक रस्त्यावर; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
Commissioners reaction on action taken against unauthorized constructions and sheds in Kudalwadi
कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईबाबत आयुक्तांचे मोठे विधान, म्हणाले…
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद

हे ही वाचा… नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक

हे ही वाचा… पालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यालयाला आग

दरम्यान हे प्रकरण पेटू लागल्यानंतर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन मंदिरावर कारवाई केली.यावेळी प्रशासनाच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी अनेकजण एकवटले होते.काहींनी कारवाईला विरोध केल्यामुळे पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया हाती घेतली असल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. तर मंदिराचे जीने आणि काही भागच अनधिकृत असल्याने ते तोडण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे मुख्य अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

Story img Loader