भाईंदर :- मिरा भाईंदर मेट्रो- ९ च्या कामातील काशिगाव स्थानकाची निर्मिती करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. यात जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे शासनाला मागील दोन वर्षांत तब्बल ७७ कोटींचा भुर्दंड बसला आहे. परिणामी येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे

मागील पाच वर्षांपासून मिरा भाईंदर शहरात ‘दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९’ उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. सध्या या प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७ टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक मार्गिकेचे काम पूर्ण केले जात आहे. या मेट्रो मार्गातील काशीगाव स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या कामात जागेची अडचण निर्माण झाला आहे. ही जागा सेवेन इलेव्हन या कंपनीची असून महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवा रस्त्यांसाठी (सर्व्हिस रोडसाठी) आरक्षित आहे. त्यामुळे विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर) देऊन ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने २०२२ मध्ये कंपनीकडे मागणी केली आहे. परंतु यास कंपनी तयार होत असल्यामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात फेर-बदल करून तेथील जीने जवळील नाल्यावर हलवले. मात्र आता ही नाल्यावरील जागा देखील आपल्या मालकीची असल्याचा दावा करून कंपनीने हे काम थांबवले आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून हा जागेचा तिढा सुटू शकलेला नाही. यामुळे शासनाला दरमहा जवळपास साडेतीन कोटीचे नुकसान होत असून आतापर्यंत ७७ कोटींचा फटका बसला असल्याचा आरोप आमदार गीता जैन यांनी केला आहे. दरम्यान ‘आम्ही महापालिकेला आधीच पत्र दिलेले असून ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्याची विनंती केली आहे. परंतु लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे प्रशासन आम्हाला मोबदला देत नसून उलट आम्हाला बदनाम करण्याचे काम करत आहे, असे स्पष्टीकरण सेव्हन इलेव्हन संस्थेच्या संचालकांनी पत्रक काढून दिले आहे.

हेही वाचा – शहरबात: फेरीवाला नियोजनात पालिकेची उदासीनता

हेही वाचा – वसई विरार मधील हजारो जन्म-मृत्यू दाखले प्रलंबित, नव्या पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीचा फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजी माजी आमदारांमध्ये वाद

सेवेन इलेव्हन ही कंपनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. हेच नरेंद्र मेहता आपण शहरात मेट्रो आणल्याचा दावा करत असतात. मात्र प्रत्यक्षात ते यात असा घोळ घालून काम पूर्ण होण्यास विलंब करत आहेत, असा आरोप जैन यांनी पत्रकार परिषदेत केला होता. जैन यांना कोणत्याही गोष्टीची काडीमात्र माहिती नसल्याचे प्रत्युत्तर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिले आहे. आजवर सेवेन इलेव्हन कंपनीने महापालिकेला जवळपास बाजारभावाप्रमाणे दोनशे कोटींच्या जागा दिल्या आहेत. त्याचे पैसे अजूनही घेतलेले नाही. तसेच ही जागा देखील आम्ही देण्यास तयार आहोत. परंतु जैन यांच्याच दाबवामुळे महापालिका आम्हाला मोबदला देत नसल्याचा आरोप मेहता यांनी देखील केले आहे.