भाईंदर : मिरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुलाचे कुटुंबीयही जखमी झाले असून वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास नया नगर येथील नूरजहाँ इमारतीत पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब अचानक कोसळला. घटनेनंतर महापालिकेचे अग्निशमन दल व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.यात तीन वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर कुटुंबीयांना उपचारासाठी मिरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.