वसई: नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिरात उदवाहक कोसळून तीन भाविक भक्त जखमी झाले होते. या प्रकरणी महिना भरानंतर नायगाव पोलीस ठाण्यात उदवाहक व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे आई चंडिका देवी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. मंदिर हे उंचावर असल्याने वयोवृद्ध व अपंग नागरिकांच्या सुविधेसाठी उदवाहक (लिफ्ट) बसविण्यात आले आहे. १० नोव्हेंबर रोजी ठाणे येथून भाविक  भक्त मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यातील काही उदवाहकामध्ये मधून वर प्रवास करत असताना चौथ्या माळावर पोहचताच अचानकपणे खाली कोसळून दुर्घटना घडली होती. यात प्रमोद सिंग(४६), सुषमा सिंग (४५) व नितीशा सिंग (२२) असे तीन भाविक भक्त जखमी झाली होती.

हेही वाचा >>>समुद्र स्वच्छता यंत्रणा वापराविनाच, स्वच्छतेअभावी किनाऱ्यांची दुर्दशा; लाखोंची यंत्र धूळखात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदवाहक व्यवस्थापण करणाऱ्याने देखभाल दुरुस्तीकडे योग्य त्या रित्या केली नसल्याने अशी दुर्घटना घडली असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. याशिवाय याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातून एमएलसी आल्यानंतर नायगाव पोलीसांनी उदवाहक व्यवस्थापक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.