चर्चगेट स्थानकाच्या नामांतराला ख्रिस्ती संघटनांचा विरोध

चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या संदर्भात राज्य शासनाकडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत.

renaming of churchgate station
चर्चगेट स्थानक (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

वसई : चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या संदर्भात राज्य शासनाकडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. नाव बदलले जाणार असल्याने वसईतील ख्रिस्ती संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी याला विरोध दर्शविला आहे. येथील जागा पूर्वी मुंबईचे मूळ रहिवासी असलेले ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाजाबरोबरच आगरी, कोळी, भंडारी इत्यादी समाजाच्या मालकीच्या होत्या.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

रेल्वेने येथील समाजाच्या जागा घेऊन रेल्वेचा विस्तार केला आहे.  या जागी व जवळपास चर्च होते. परंतु रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी ते इतरत्र हलविण्यात आले व यामुळेच तेथील रेल्वे स्टेशनला चर्चगेट नाव देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.  नाव बदलणे म्हणजे मुंबईचे मूळ मालक असलेले हजारो स्थानिक समाजाचा अनादर करण्यासारखे असल्याचे वसईचे चार्ली रोझारियो यांनी सांगितले आहे. शासनाने चर्चगेट स्थानकाचा इतिहास लक्षात घेता  मुंबईतील मूळ मालक असलेल्या हजारो समाजाचा योग्य तो आदर राखून चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलू नये अशी मागणीही चार्ली रोझारियो यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 02:30 IST
Next Story
मीरा भाईंदरमध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा
Exit mobile version