भाईंदर : शारीरिक तंदुरूस्ती आणि इंधनाच्या बचतीसाठी मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात सायकल मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर मीरा रोड येथे ७० लाख रुपये खर्चून एक किलोमीटर लांबीची सायकल मार्गिका (ट्रॅक) तयार केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहने, औद्य्ोगिकीकरण यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. दुसरीकडे इंधन देखील मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असते. यासाठी पालिकेने नागरिकांना सायकलच्या वापरण्याचे आवान केले आहे. सायकलीलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सायकल मार्गिका विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर मीरा रोड येथील जे.पी.इन्फ्रा या मार्गांवर ‘सायकल ट्रक’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.पंधराव्या वित्त आयोगातुन पालिकेला ३१ कोटी रुपये  वर्ग करण्यात आला आहे. या निधीचा वापर पालिका विविध उपRम राबवण्याकरिता करत आहे. या निधीतून ७० लाख रुपये या मार्गिकेसाठी खर्च केले जाणार आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycle path in mira road physical health care fuel savings ysh
First published on: 21-09-2022 at 00:02 IST