वसई : वसई- विरारच्या गोकुळ टाऊनशीप येथे प्राध्यापिका आत्मजा कासाट यांना धडक देणारा चालक शुभम पाटील (२४) हा मद्याच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळी झालेल्या अपघाता प्रा आत्मजा यांचा मृत्यू झाला होता.

विरारच्या विवा कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. आत्मजा कासाट या इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. गुरूवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यावर त्या गोकुळ टाऊनशीप येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी मुलजीभाई मेहता शाळेजवळ मागून येणार्‍या फॉर्च्युनर गाडीने त्यांना धडक दिली होती. या धडकेत गंभीर जखमी असलेल्या प्रा. आत्मजा यांना विरारच्या प्रकृती या खासगी रुग्णालयात दाखळ करण्या रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला होता. फॉर्च्युनर गाडी शुभम पाटील (२४) नावाचा तरूण चालवत होता. अपघात घडला तेव्हा गाडीत त्याचा मित्र आणि अन्य दोन तरूणी होत्या. ते सर्व मद्याच्या नशेत होते. नवीन विवा महाविद्यालयाजवळ गाडीत ते मद्यपान करत होते, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.आरोपी शुभम पाटील याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिंमंडळ ३) जयंत बजबळे यांनी दिली. आरोपी हा डोंगपाडा येथे राहणारा असून व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांचा खदाणीचा व्यवसाय आहे.

हेही वाचा…भरधाव गाडीने घेतला बळी; विवा महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेचा मृत्यू

आमदार ठाकूरांच्या मुलाची मदत ठरली व्यर्थ…

अपघात घडला तेव्हा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा शिखर ठाकूर आपल्या मित्रांसमवेत जात होता. तेव्हा त्यांना प्रा. आत्मजा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी त्याच गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्या शुध्दीत होत्या. त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांशी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.

हेही वाचा…पोलीस बनून केली मैत्री, नोकरीच्या आमिषाने उकळले ५० लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रा. आत्मजा यांच्या त्या स्टेटसची चर्चा

दरम्यान, या घटनेमुळे वसई विरार शहरातील संतापाची लाट पसरली आहे. प्रा. आत्मजा या सामाजिक क्षेत्रात सक्रीय होत्या. त्या विवा कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या. त्यांच्या या दुर्देवी मृत्यूबद्दल महाविद्यालयाचे विश्वस्त संजीव पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. गुरूवारी प्रा आत्मजा यांनी आपल्या मोबाईलवर स्वामी समर्थांचा फोटो ठेऊन आरंभ तू अंत तू, शून्य मी..अनंत तू असा मेसेज ठेवला होता. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते या संदेशातून स्पष्ट होत असल्याने या स्टेटसची चर्चा होत आहे.