लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई: नालासोपारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे बुधवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी या देखील वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.

बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास श्याम पेंढारी आपल्या ब्रिजा गाडीतून (MH 02 GB 935) मुंबई वरून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत होते. सध्या महामार्गावर कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी असते. त्यामुळे पेंढारी यांनी विरूद्ध दिशेने गाडी टाकली होती. महामार्गावरील मालजीपाडा येथे लोढा धाम शेजारी एक आयशर ट्रक (DD 03 R 9093) मुंबईच्या दिशेने येत होता. त्या आयशर ट्रक ने पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली. दोन्ही वाहने एकमेकांना आदळल्याने हा भीषण अपघात घडला.

आणखी वाचा-वसई : चाळीस हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया, कचरा भूमीवरील समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्याम पेंढारी तसेच गाडीतील अन्य व्यक्तीला उपचारासाठी मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. नायगाव पोलिसांनी अपघातातील आयशर चालकाला ताब्यात घेतले आहे.