माजी रणजीपटू सुरेश अनंत देवभक्त यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने विरारच्या आगाशी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.सुरेश देवभक्त दोदू या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या १२ व्या वर्षापासून वसई तालुका क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या देवभक्त यांनी स्थानिक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली होती. १९७१ मध्ये त्यांनी रणजी करंडक मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रणजी सामना खेळला होता. त्यांनी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजविल्या होत्या नॅशनल क्रिकेट क्लब यंग मेन्स आणि नवरोझ क्रिकेट संघातर्फे खेळताना त्यांनी अनेक पराक्रम केले.

हेही वाचा >>> मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांगा क्रिकेटमझ्ये १०० आणि १००० धावा करणारे ते वसईतील एकमवे क्रिकेटपटू ठरले होते. हार्ड कॅसल वॉर्ड कंपनीतर्फे टाईम्स गटात खेळताना देवभक्त यांनी सलीम दुराणी यांच्यासह केलेली १८७ धावांची भागादारी गाजली होती. या स्पर्धेत त्यांच्या संघाने मॅकेन्झी ढाल जिंकली होती. सेंट्रल बॅंक आणि टाटा स्पोर्टसतर्फे खेळतांना त्यांनी अनेक पराक्रम केले. कॉस्मोपोलिटीन ढाल क्रिकेट स्पर्धेत २०२६ धावा पटकावून त्यांनी दिलीप सरदेसाई यांचा विक्रम मोडीत काढला होता. त्यांच्या पश्चात त्यांचा भाचा कवीश कत्रे आहे. गुरूवारी दुपारी आगाशी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी देवभक्त यांच्या निधानबद्दल शोक व्यक्त केला आहे.