वसई :  राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करुन जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, अशी मागणी करीत मंगळवारी वसईतील विविध विभागातील मोठय़ा संख्येने शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले होते याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला असल्याचे चित्र दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करणे व मा बक्षी समितीने खंड २ च्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वेतन त्रुटी दूर केल्या नाहीत याबाबत फेर विचार करणे यासह इतर मागण्यासाठी वसई तालुक्यातील शासकीय कर्मचारम्य़ांनी संप पुकारला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शाळा आणि आरोग्य यंत्रणेवरही संपाचा परिणाम झाला आहे. वसईतील पंचायत समिती, तहसिल दार विभाग कर्मचारी, शिक्षण अशा विभागातील कर्मचारी यात सहभागी झाले होते. शासनाने मागण्या मान्य कराव्यात या मागणी साठी वसई तहसिलदार कार्यालय,पंचायत समिती कार्यालय अशा ठिकाणी एकत्रित येत निदर्शने करण्यात आली. ‘ एकच मिशन, जुनी पेन्शन अशी घोषणा बाजी केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact on day to day operations in vasai disruption in government offices ysh
First published on: 15-03-2023 at 01:14 IST