वसई: वसईतील महिला रिक्षाचालक आणि आंतरराष्ट्रीय धावपटू मिनाज नदाफ या मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री त्यांच्या रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाने त्यांना मारहाण करून हातातील मोबाईल हिसकावून नेला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाने नदाफ यांना धडक दिली. त्यात नदाफ या गंभीर जखमी झाल्या आहेत.

नालासोपाराच्या सेंट्रल पार्क येथे राहणाऱ्या मिनाज नदाफ या महिला रिक्षा चालक आहेत. त्याचबरोबर त्या धावपटू म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध राज्यांत तीनशेहून अधिक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून जवळपास १८० पदके जिंकली आहेत. नुकत्याच त्या श्रीलंका येथील स्पर्धेत भाग घेऊन परतल्या होत्या. गुरुवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत होत्या. रात्री १०:३० च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या गावराई पाडा येथे त्यांच्या रिक्षात एक प्रवासी बसला. अचानक त्या प्रवाशाने नदाफ यांच्या हातातील मोबाईल खेचला. यावेळी नदाफ यांनी त्याच्याशी झटपट केली. मात्र त्याने नदाफ यांना मारहाण करून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी नदाफ त्याच्या मागे धावल्या. त्याच वेळेला भरधाव वेगाने आलेल्या एका रिक्षाने त्यांना धडक दिली.

West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

हेही वाचा : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मतदारांना ठाकरेंची साद, वसईतील ख्रिस्ती शिष्टमंडळाशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

या धडकेमुळे त्या जखमी होऊन खाली पडल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली आहे. पेल्हार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत नदाफ यांनी दोन रौप्य आणि एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे.