वसई : एका मुलीवर मागील ८ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणारा नालासोपारा मधील डॉक्टर योगेंद्र शुक्ला याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असल्यापासून डॉ शुक्ला तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत होता.

पीडित तरुणी सध्या २१ वर्षाची असून नालासोपारा येथे रहाते. २०१६ मध्ये ती १४ वर्षांची असताना डॉ योगेंद्र शुक्ला याच्या संपर्कात आली होती. आरोपी डॉ शुक्ला याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. तू १८ वर्षांची सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन अशा भूलथापा तिला मारल्या. मात्र ती १८ वर्षांची झाल्यावर तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करु लागला. यानंतरही तिचे लैंगिक शोषण सुरू होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा : तिन्ही मतदारसंघ कायम राखण्याचे हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आचोळे पोलिसांनी आरोपी डॉक्टर योगेंद्र शुक्ला याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) ६४(ड) ६९ तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायद्याच्या ( पोक्सो) कलम ४,८ १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉ शुक्ला याला पोलिसांनी अटक केली असून ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा : वसईतील शिक्षणमहर्षी सुरेश वायंगणकर यांचे निधन

तरुणींना तक्रार करण्याचे आवाहन

ज्या मुलींचे अशा प्रकारे डॉक्टर शुक्ला याने लैंगिक शोषण केले त्यांनी आचोळे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.