भाईंदर :- मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पदचारी पुलावर लावले जाणारे अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय दूर झाली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर तसेच ससूनवघर येथे महामार्ग प्राधिकरणामार्फत पादचारी तसेच दुचाकी पूल उभारण्यात आला आहे. मात्र पुलाच्या उभारणीनंतरच त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक लावले जात असल्याचे दिसून येत होते. महामार्गांवर अयोग्य ठिकाणी जाहिरात दिसून आल्यास चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा अनधिकृत फलकांवर कारवाई करणे आवश्यक असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात लोकसत्ता वृत्तपत्राने २५ जुन २०२५ रोजी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने पुलावरील जाहिराती हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच अशा जाहिराती लावणाऱ्याचा शोध लागल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.