वसई- वसई विरार शहारतील निवासी संकुलांप्रमाणे खासगी आस्थापनांनेही अग्निसुरक्षा लेखापरिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. चालू वर्षात शहरातील केवळ ७४१ खासगी आस्थपनाांनी अग्निसुरक्षा लेखापरिक्षण केले आहे. त्यामुळे शॉपिग मॉल, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी आगीचा धोका कायम आहे. अग्निसुऱक्षा लेखापरिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी पॅनल नियुक्तीच्या घोषणेनंतर अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही.

संभाव्य आगीच्या घटनांपासून वाचवण्यासाठी अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करण्याची गरज असते. मात्र वसई विरार मध्ये निवासी संकुलांबरोबर खासगी आस्थापना अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करण्यात उत्सुक नसल्याचे आढळून आले आहे. आगीची दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व आस्थापनांना अग्निसुरक्षा लेखापरिक्षण (फायर सेफ्टी ऑडीट) करून घेण्यासाठी पालिका नोटीसा बजावत असते. शासनाने निर्देशित केलेल्या एजन्सी मार्फत हे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करायचे असते. मात्र प्रत्यक्षात कुणीही अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करण्यास स्वारस्य दाखवत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने रहिवाशी संकुलापेक्षा पालिकेने मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, उपहारगृह, मल्टिप्लेक्स अशा गर्दीच्या ठिकाणी अग्निसुरक्षा करण्यावर भर देण्याचे ठरवले होते. त्यासाठी चालू वर्षाच १ हजार ३४८ खासगी आस्थापनांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु त्यापैकी केवळ ७४१ खासगी आस्थापननांनी अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करवून घेतले आहे. हे प्रमाण अत्यल्प असल्याने शहराला आगीचा धोका कामय आहे.

हेही वाचा >>>पालघर मध्ये अमली पदार्थाचा कारखाना, ३७ कोटींची एमडी जप्त; मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेची कारवाई

शाळा, रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण पूर्ण

पालिकेने शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण करण्यावर भर दिला होता. त्यानुसार शहरातील ३३६ शाळा आणि ३०९ रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण पूर्ण झाल्याची माहिती उपायुक्त (अग्निशमन) पंकज पाटील यांनी दिली.

पॅनलसाठी निवृत्त अग्निशमन अधिकारी मिळेना

वसई विरार शहरातील अग्निसुरक्षेता मुद्दा विधिमंडळातउ पस्थित झाल्यानंतर शासनाने आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण जलद गतीने होण्यासाठी पॅनल  नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. या पॅनलमध्ये निवृत्त अग्निशमन अधिकार्‍यांचा समावेस करायचा होता. मात्र असे निवृत्त अग्निशमन अधिकारी मिळालेले नाहीत. त्यामुळे अग्निशमन तज्ञ घेऊन या पॅनलद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले

शहरातील आगीच्या घटना

सन २०१७ मध्ये ६८६

सन २०१८ मध्ये ८१९

सन २०१९ मध्ये ८०३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०२० मध्ये ६५९