लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई विरार मधील विविध ठिकाणी अजूनही उघडी व तुटलेल्या अवस्थेतील गटारांची झाकणे आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. नुकताच नालासोपारा येथील रहेमत नगर येथे एका महिलेचा पाय अडकून जखमी झाली आहे.

वसई विरार शहरात सांडपाणी निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी गटार व्यवस्था करण्यात आली आहेत. त्यावर पालिकेने सुरवातीला झाकणे बसविली होती. परंतु त्यांची देखभाल दुरुस्ती योग्य रित्या होत नसल्याने अजूनही अनेक ठिकाणी गटारांची झाकणे उघडी व तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका कायम आहे. या उघड्या गटारांच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने अपघाताच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा-माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे अपघाती निधन, महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करणे जीवावर बेतले

नालासोपारा प्रभाग समिती ब मधील रेहमत नगर येथे गटाराचे झाकणे उघडे असल्याने नुकताच फुटपाथ वरून चालत जाताना  महिला त्यात अडकून जखमी झाली आहे. उघड्या गटारामुळे शहरात अनेक अपघात घडले आहेत. अशी स्थिती असतानाही पालिकेने विविध प्रभागातील गटाराच्या झाकणांच्या दुरुस्तीकडे पालिकेने लक्ष दिलेले नाही. पालिकेने शहरातील गटार व्यवस्थेचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुरुस्तीही निकृष्ट दर्जाची?

पालिकेकडून तुटलेल्या गटारांची दुरुस्ती केली जाते परंतु करण्यात येत असलेली दुरुस्ती सुद्धा काही ठिकाणी निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याने अनेक झाकणे ही तात्काळ तुटून जात  आहेत. त्यामुळे गटारांचे झाकणे बसविताना ती सुस्थितीत आहेत किंवा नाही याची खात्री करावी असे नागरिकांनी सांगितले आहे.