वसई- होळी सणात थंडाईला मागाणी वाढू लागली आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रात लाखो लिटर थंडाईची विक्री झाली आहे. त्यात साडेसहा हजार लिटर ताजी थंडाईची तर ९२ लाख ७५ हजार मिली लीटर रेडी टू मेक थंडाई विक्री झाली आहे. मागी वर्षांच्या तुलनते ताज्या थंडाईची मागणी २० टक्क्यांनी तर तयार (रेडी टू मेक) थंडाईची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली आहे.

सोमवारी धुळवड सण सर्वत्र जल्लोषात साजरा झाला. धुळवड म्हणजे रंगांची उधळण, एकमेकांना रंगांनी माखवणे, रंगांचा आनंद लुटणे मात्र या लोकोत्सवामध्ये रंगांसह खाद्यपदार्थांचीही रेलचेल असते. पुरणपोळी, तेलपोळी, गूळपोळी, खापरोळी आदी होळीला बनवतातच, मात्र धुळवडीला गुजिया, जिलेबी, मालपुवा आणि थंडाई अशा उत्तर भारतीय पदार्थांची हमखास वर्णी लागते. यात थंडाईने आपली विशेष जागा मिळवली आहे. धुळवड इमारतीखाली असो की संकुलात, मैदानावर किंवा अगदी मोठ्या सेलिब्रेटी रंग महोत्सवातही थंडाईला मोठा मान असतो. गेल्या काही वर्षांत थंडाईला खूप लोकप्रियता मिळली आहे. यंदा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार आदी भागांमध्ये ६ हजार ५०० लीटर ताजी थंडाई विकली गेली, तर ९२ लाख ७५ हजार मिली लीटर रेडी टू मेक थंडाई विकली गेली.

Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

लाखो लीटर थंडाईची विक्री

मुंबई महानगर प्रदेशात होम मेड, गुरुकृपा, मॉकटेल अँड मोअर हे थंडाई बनवून त्याची सर्व शहरांमध्ये विक्री करतात. यांनी मागील वर्षी धुळवडीकरिता ताजी थंडाई साडेपाच हजार लीटर एवढी विकली होती तर यंदा साडेसहा हजार लीटर एवढी थंडाईची विक्री झाली आहे, अर्थात यंदा २० टक्क्यांनी ताज्या थंडाईची मागणी वाढली आहे. मुख्यत्त्वे ताजी थंडाईही ही ऑफिस पार्टी, संकुले, होळी उत्सव-महोत्सव, हॉटेल-रेस्टॉरंट, रिसॉर्टवरील होळी पार्टी आदी ठिकाणी विकली जाते. ताज्या थंडाईची मागणी बघता यंदा अनेक मिठाई उत्पादकांनींही तयार थंडाईची विक्री केली. रबडीवाला, ॲप्रिकॉट ओजी, अग्रवाल, पटनावाला, मेड ऑफ मिल्क आदी मिठाई दुकानांनी ७८० लीटर ऑनलाईन ताजी थंडाई विकली. असे पीएन विक्रेते एंटरप्रायझेसचे ऑपरेशन व्यवस्थापक ए. ए. कडू यांनी सांगितले.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

यंदा रेडी टू मेक म्हणजे तयार मिश्रणात दूध घालून व्यवस्थित एकत्र केल्यावर थंडाई बनते, या थंडाईच्या तयार मिश्रणाच्या सहा महिने ते एक वर्ष टिकेल असे मिश्रण बाजारात मिळते. ही रेडी टू मेक थंडाईची यंदा ९२ लाख ७५ हजार मिलीलीटर एवढी विक्री झाली. ७५० मिलीलीटरच्या साडेदहा हजार बाटल्या तर २०० मिलीलीटरच्या ७ हजार बाटल्या यंदा विकल्या गेल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३६ टक्क्यांनी रेडी टू मेक थंडाईची मागणी वाढली आहे, ही माहिती थंडाईचा सर्व शहरांमध्ये पुरवठा करणारे सिरियल एंटरप्रायझेस अँड फूडचे अध्यक्ष मनिष आणि संजय सावला यांनी दिली.

हेही वाचा – टोकाच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवार हे प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार व नामनिर्देशन पत्र भरण्यास येणार का ?

थंडाई कशी बनते?

थंडाई म्हणजे एक प्रकारचे मिल्कशेकच असते. मात्र थंडाईत मुबलक प्रमाणात सुका मेवा घातला जातो. काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यासह टरबूज, भोपळा यांच्या बिया तसेच खसखस, काळिमिरी, वेलची, केशर, गुलाब पाणी आणि साखर आदी सामग्री वाटून दुधामध्ये एकत्र केली जाते.

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

थंडाईच्या सेवनाचे फायदे

होळीला सेवन करण्यात येणारे सर्वच पदार्थ मुख्यत्त्वे थंडाई हे येत्या उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी खाल्ले जातात, असे आयुर्वेदीक तज्ज्ञ स्वाधिनता जोशी यांनी सांगितले. थंडाईच्या सेवनाने उन्हाळी किंवा वातावरण बदलामुळे होणारी उष्णतेची सर्दी, खोकला, घशाचे आजार बरे होण्यास सहाय्य मिळते. तर अपचन आणि त्यामुळे होणारी डोकेदुखी, ढेकर आदी गोष्टींवर उपचारात्मक काम करते. येणाऱ्या उन्हाळ्याच्या तडाख्यापासून शरिराचे रक्षण करण्यासाठी एक कवच बनवते, थोडक्यात रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) वाढवते, असेही जोशी यांनी सांगितले.