वसई : वसई-विरार शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच पाण्याची कमतरता आणि त्यातच गळती तसेच वितरण व्यवस्था नसल्याने नागरिकांना ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. यामुळे ऐन उन्हाळय़ात पाण्यावाचून हाल होऊ लागले आहे. पालिकेने अद्याप नळजोडण्या देण्यास सुरुवात केलेली नाही. दुसरीकडे पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून पाणीटंचाईमुळे पालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार शहराला सुर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २३० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ २२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे १५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. दररोज ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी असल्याने नागरिकांना उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराच्या धरणात मुबलक पाणी असले तरी नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. मात्र अनेक भागांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe water shortage vasai daytime water supply liters of water shortage ysh
First published on: 23-03-2022 at 00:02 IST