सुहास बिऱ्हाडे

वसई : संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करण्यासाठी गेल्या वर्षभर दिल्लीत फेऱ्या मारत आहेत.या खटल्याचा जलदगती न्यायालयात निकाल लागला नाही, तसेच पोलिसांच्या तपासातील दिरंगाईबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकानेही काहीच कारवाई केली नाही, असा आरोप विकास वालकर यांनी केला.

वसईतील श्रद्धा वालकर (वय २८) ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीत राहत होती. मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुरगाव येथील जंगलात फेकून दिले. १४ नोव्हेंबर रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. आफताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकडय़ांपैकी १३ अवशेष दिल्ली पोलिसांना मिळाले आहेत. श्रद्धावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने तिचे वडील विकास  मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करत सतत दिल्लीवारी करत आहेत. मात्र अद्यापही त्यांना मृतदेहाचे अवशेष मिळालेले नाहीत. ‘मी मागील वर्षभरात स्वखर्चाने २५ हून अधिक वेळा दिल्लीत गेलो आहे. मला जर माझ्या मुलीच्या मृतदेहाते अवशेष दिले नाहीत तर मी दिल्लीत बेमुदत उपोषण करणार आहे,’ असा इशारा विकास वालकर यांनी दिला.खटला थंडावला श्रद्धा  हत्याकांड प्रकरण जलगदती न्यायालयात चालवले जाणार होते. मात्र  खटला सुरू आहे. अद्याप न्याय न मिळाल्याने जलगती न्यायालय ही पोकळ घोषणा होती, असेही वालकर यांनी सांगितले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  मदतीचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनीही  पाठ फिरवल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>वसई: मुलींनो सावधान! शहरात फिरतोय सीरियल रेपिस्ट; माहिती देणार्‍यास पोलिसांकडून बक्षिस जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष तपास पथकाचे काय झाले?

श्रद्धा  प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास वसई पोलिसांनी टाळाटाळ केली होती. तुिळज पोलिसांनी मारहाणीच्या तक्रारीचा तपास केला नव्हता. याबाबत गृहमंत्री देवेद्र फडवणीस यांनी  चौकशी करण्याची घोषणा केली होती. या विशेष तपास पथकाचा तपास का थंडावला, असा सवाल वालकर यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केला आहे.