वसई- भाईंदर रेल्वे स्थानकात मेहता पिता पुत्रांनी आत्महत्या का केली त्याचे गूढ अद्याप कायम आहे. मेहता कुटुंबीय कर्जबाजारी असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले असले तरी आमच्यावर कसलेच कर्ज नव्हते तसेच कुठलाही तणाव नव्हता, असे मेहता यांच्या सुनेने बुधवारी पोलिसांना सांगितले. पोलिसांनाही ते कर्जबाजारी असल्याची माहिती मिळाली नाही.

वसईतील हरीश मेहता (६०) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (३०) यांनी सोमवारी सकाळी भाईंदर येथे रेल्वे रुळावर धावत्या ट्रेनखाली झोपून आत्महत्या केली होती. त्यांचे आत्महत्येचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. वसंत नगरी येथील रश्मी दिव्य कॉम्प्लेक्स या इमारतीत हरिश मेहता (६०) हे पुत्र जय मेहता (३०) आणि सून अंजली महेता (२७) यांच्यासह राहात होते. जय हा लोअर परळ येथील वरुण ब्रेव्हरीज या कंपनीत कामाला होता. एक वर्षापूर्वी त्याचा अंजलीबरोबर आंतरजातीय विवाह झाला होता. निवृत्त असलेले हरिश मेहता हे शेअर बाजाराचा व्यवहार करत होते. ८ जुलै रोजी मेहता पिता पुत्र भाईंदर रेल्वे स्थानकात आले. फलाट क्रमांक ६ वरून ते चालत मिरा रोडच्या दिशेने गेले आणि रेल्वे रूळावर ट्रेनखाली झोपले. जागीच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – ठाकूरशाहीला बोईसरमध्येही हादरा?

आत्महत्येचे गूढ अद्याप कायम

मेहता यांच्या घरात लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणाला (धीस मॅटर) आम्ही जबाबदार आहोत असे इंग्रजीत लिहिले होते. त्यामुळे आत्महत्या की अन्य प्रकरण हे स्पष्ट झालेले नसल्याचे वसई रेल्वे पोलिसांनी सांगितले. मेहता यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते आणि बॅंकेचे कर्मचारी घरी येत असायचे अशी माहिती मेहता यांच्या शेजाऱ्यांनी दिली. मात्र शहा यांची सून अंजली हिने पोलिसांनी आमच्यावर कसलेच कर्ज नसल्याचे सांगितले. घरात कुठलाही वाद नव्हता की तणाव नव्हता. पतीचे उत्पन्नदेखील चांगले होते आणि आम्हाला आर्थिक अडचण नव्हती असे तिने पोलिसांना सांगितले. यामुळे नेमकी आत्महत्या का केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आम्ही मयत मेहता यांचे बॅंकेचे तपशील, ईमेल तपासले आहे. त्यात कर्जबाजारी असल्याचे काही आढळले नाही, असे पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितले. वसई पोलिसांना मेहता पिता पुत्रांचे मोबाईल सापडले आहेत. त्याचा सीडीआर पोलीस काढत आहेत. आत्महत्या करण्याठी जाताना जय मेहता याच्या पाठीवर एक बॅग होती. ती बॅग पोलिसांना सापडली आहे, मात्र त्यात किरकोळ सामान होते.

हेही वाचा – वसई : चावी विक्रेत्याला ३ लाखांची नुकसान भरपाई, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या दिवशी नेमकं काय झाल?

बुधवारी वसई रेल्वे पोलिसांनी मयत जय मेहता याची पत्नी अंजली मेहता हिचा जबाब नोंदविला. अंजली एका खासगी कंपनीत काम करते. ५ जुलै रोजी ती कामावर गेली आणि बहिणीचा वाढदिवस असल्याने परस्पर माहेरी गेली होती. ८ जुलै रोजी ती परतणार होती. मात्र सोमवार ८ जुलै रोजी दिवसभर पती जय आणि सासरे हरिश यांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे तिने शेजार्‍यांना फोन करून घरी चौकशी करण्यासाठी सांगितले होते. परंतु दार बंद असल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. त्यानंतर तिने अन्य नातेवाईकांना याबाबत माहिती दिली होती.