वसई : वसई विरार शहराच्या वाढत्या नागरिकरणाच्या सोबतच शाळांची संख्येतही वाढ होऊ लागली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून वसईच्या शिक्षण विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने अडचणी कायम आहेत.नऊशेहून अधिक मंजूर पदे असूनही सद्यस्थितीत केवळ ६५५ इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे.

वसई विरार शहरात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. त्यातच शिक्षण विभागाचे दैनंदिन कामकाज यासर्व गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून शिक्षणविभागाला मनुष्यबळ मिळत नसल्याने आहे त्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना  अतिरिक्त भार सोपवून कामकाज  करावे लागत आहे.

वसईत शहरी व ग्रामीण मिळून एक हजारांहून अधिक शाळा आहेत. त्यात १९२ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. या शाळांचे नियंत्रण वसईच्या शिक्षण विभागाकडून पाहिले जाते. तसेच शिक्षणाच्या संबंधित  शासनाचे विविध उपक्रम ही राबविले जातात. यामध्ये  गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी, लिपिक, केंद्रप्रमुख, समाजशास्त्र, विज्ञान, भाषा शिक्षक, सफाई कर्मचारी, व इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

विशेषतः इतक्या मोठ्या तालुक्यात गटशिक्षण अधिकारी पद प्रभारी म्हणून ठेवण्यात आले आहे. तसेच पंचायत समिती शिक्षण विभागात केंद्रप्रमुख हा महत्त्वाचा घटक समजला जातो. गावातील शाळा तेथील शिक्षक, पालक ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून शैक्षणिक ध्येय धोरण व अन्य कामकाजातील महत्त्वाची भूमिका केंद्र प्रमुखामार्फत बजावली जाते.

वसईत १३ केंद्र प्रमुखांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र केवळ कामण, वालीव, बोळींज अशा तीनच ठिकाणी केंद्र प्रमुख उपलब्ध आहेत. अन्य ठिकाणच्या केंद्रावर शिक्षकांना अतिरिक्त भार देऊन केंद्रप्रमुखांची कामे करवून घेतली जात आहेत. अजूनही केंद्र प्रमुखांची भरती प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्र प्रमुखांची कमतरता भासत आहे.

वसईच्या शिक्षणविभागासाठी ९१९ पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ६५५ इतके कर्मचारी कार्यरत आहेत तर २६४ कर्मचाऱ्यांची पदे रिक्तच आहेत. शिक्षक कर्मचारी कमी असल्याने प्रत्येक कामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. तर काही कर्मचारी हे सेवानिवृत्त होतात त्यामुळे त्याठिकाणी नवीन कर्मचारी येईपर्यंत त्या कर्मचाऱ्यांची कामेही अतिरिक्त भार देऊन करवून घ्यावी लागत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विज्ञान शिक्षकांची कमतरता

वसई विरार मध्ये विज्ञान विषयासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. १०६ विज्ञान शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ ८ विज्ञान शिक्षक आहेत. ९८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच शिक्षकाला सर्व विषय शिकवावे लागतात. पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळेत विज्ञान शिकविताना ही अडचणी येत आहेत. अद्यावत अशा प्रयोग शाळा झाल्या खऱ्या परंतु प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी शिक्षकच नसल्याने अडचणी कायम असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिक्षण विभाग अडगळीत

वसई पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे तेथून शिक्षण विभाग हटवून तो त्या बाजूलाच असलेल्या छोट्या खोल्यामध्ये स्थलांतर केला आहे. जागा अपुरी असल्याने दाटीवाटीच्या परिस्थिती येथील कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. याशिवाय प्राथमिक सोयीसुविधेच्या ही अडचणी आहे. अशा अडगळीत पडलेल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांना वावरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांची आकडेवारी 

पद मंजूर कार्यरत रिक्त
गटशिक्षणाधिकारी
विस्तार अधिकारी
केंद्रप्रमुख १३१०
पदवीधर भाषा६९४०२९
विज्ञान शिक्षक१०६९८
समाजशास्त्र४५४०
इतर शिक्षक६६६५५४११२
वरिष्ठ सहायक
कनिष्ठ सहायक
शिपाई
एकूण९१९६५५२६४