वसई: वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पहिल्याच आढावा बैठकीत पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शाळा सुरू करण्याबाबत पालिकेच्या उदासिनतेबबाबत त्या चांगल्याच संतप्त झाल्या. पालिकेचे बजेट वाढवा, मॅरेथॉन सारखे उत्सव बंद करा पण शाळा सुरू करा असे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्नेहा दुबे पंडित या वसई विधानसभेवर निवडून आल्या आहेत. आमदार झाल्यावर त्यांनी कामांना सुरुवात केली आहे. पालिकेने कुठली कामे केली केली, कुठली कामे प्रलंबित आहेत त्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्नेहा दुबे यांनी पालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत समाधानकारक काम न आढळल्याने त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

हेही वाचा : वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप

वसई विरार महापालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे झाली आहेत. मात्र महापालिकेची एकही शाळा नाही. याबाबत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ११७ शाळा हस्तांतरित करण्याबाबत विचार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु या शाळा ताब्यात घेतल्या तर पालिकेवर १०० कोटींचा ‘बोजा पडेल असे उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी दिले. ते ऐकतात स्नेहा दुबे चांगल्याच भडकल्या. शिक्षण देणे हे महापालिकेचे मूलभूत कर्तव्य आहे. त्याला बोजा कसा म्हणू शकता असा सवाल त्यांनी केला. पालिकेच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची वाढ करा. वेळ पडली तर मॅरेथॉन आणि पैशांची उधळपट्टी करणारे उत्सव बंद करा, पण शाळा सुरू करा आणि त्यांनी सांगितले. ११७ शाळा स्वतंत्र सुरू करण्यापेक्षा दहा दहा शाळा एकत्रित करून एकेक शाळा विकसित करा, अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे वेतन शासनाकडून दिले जाते. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा, असेही त्या म्हणाल्या

हेही वाचा : नालासोपाऱ्यातील पुराचा प्रश्न अखेर सुटला, निळेगावात कामाला रेल्वे मंत्रालयाची परवानगी

पर्यटन आणि तिर्थस्थळाच्या विकासासाठी काय योजना आहेत त्याबाबत दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आरोग्य सुधारणा कशी करणार? राखीव भुखंडांवरील अतिक्रमण, पाणी योजनेतील अनियमिततट आदींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र त्याच्यावर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. विकास कामे सुरू असताना त्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी फलक लावण्याचे आदेश त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसले. शाळा सुरू करण्याबाबत पालिकेचे असलेली उदासीनता संतापजनक होती. यापुढे दर महिन्याला बैठक घेणार असून दिलेल्या सूचना आणि कामे झाली की नाही त्याचा आढावा घेणार असल्याचे स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले.