पाच महिन्यांत केवळ ११ टक्के  लसीकरण

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  वसई-विरारमध्ये लशींचा मोठा तुटवडा असल्याने पालिकेकडून राबविले जाणारे लसीकरण संथगतीने सुरू आहे. पालिकेने आतापर्यंत ११ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या तुलनेत लसीकरणात केवळ ४ टक्के वाढ झाली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेचा पुरता गोंधळ उडाला असताना शासनाकडून होणाऱ्या लशींचा तुटवडा असल्याने लसीकरण  संथगतीने  होत आहे. जानेवारी महिन्यापासून अनेकवेळा केवळ लस उपलब्ध होत नसल्याने पालिकेचे सत्र रिकामे गेले आहेत. मे महिन्यात एकूण लसीकरण  ७.५ टक्के, तर जून महिन्यात एकूण लोकसंखेच्या केवळ ११.५ टक्के लसीकरण करण्यात पालिकेला यश आहे. यातसुद्धा पहिली मात्रा ९.१ टक्के नागरिकांना, तर दुसरी मात्रा २.१ टक्के नागरिकांना देण्यात आली आहे. यामुळे अजूनही ८८.५ टक्के नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.

२१ जूनपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र  १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण संथ सुरू आहे, १८ ते ४४ वयोगटासाठी पहिली मात्रा १.७ टक्के आणि दुसरी मात्रा केवळ ०.४ टक्के एवढे लसीकरण झाले आहे.

सहा महिन्यांत पालिकेकडे दोन लाख आठ हजार २००  कोव्हिशिल्ड, तर १७ हजार १०० कोवॅक्सिन  लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. यातून पालिकेने १ जुलैपर्यंत दोन लाख ५६ हजार ६४२ नागरिकांना लस दिली आहे.

वयोगट                 लोकसंख्या      पहिली मात्रा     दुसरी मात्रा

टक्केवारी     टक्केवारी

१८ ते ४४               ९३५०००           १.७                 ०.४

आरोग्य सेवक       १३३०९             ९८.६                ७२.३

पहिल्या फळीतील  १४३११            ९८.४                 २०.६

६० वर्षांवरील          २०००००         ३८. ८                ९.६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४५ ते ५९                ६०००००        १४. ९                १. २

२०८२०० कोव्हिशिल्ड

१७,१००  कोवॅक्सिन

 

सहा महिन्यांत पालिकेकडे करण्यात आलेला लशींचा पुरवठा.