लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : पत्नीची छेड काढल्याने मित्राची हत्या केल्याचे प्रकरण विरारमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे. एक महिन्यापूर्वी आरोपीने आपल्या मित्राची हत्या केली होती.

honey trap set to take revenge of lover kidnapped and demanded a ransom of 1 lakh
वसई : प्रियकराचा बदला घेण्यासाठी लावला ‘हनी ट्रॅप’, अपहरण करून मागितली १ लाखांची खंडणी
Vasai, Pelhar Police, Pelhar Police station, Pelhar Police Solve Murder of Unidentified Youth, murder solve help of google, Accused, crime news, murder news, vasai news,
खिशातील एक चिठ्ठी आणि गुगलवरून शोध, महामार्गावरील तरुणाच्या हत्येची उकल
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
nala sopara factory blast marathi news
नालासोपाऱ्यात कारखान्यात थिनर टँक स्फोट, कामगार जखमी

एप्रिल महिन्यात विरार पूर्वेच्या साईनाथ नगर येथील डोंगरावर एका इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच्या हातावर ‘शारदा’ असे नाव गोंदविलेले होते. काही दिवसांनी रमेश नायर (४८) नावाचा इसम बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली. त्याची पडताळणी केली असता डोंगरावर आढळलेला मृतदेह हा रमेश नायरचा असल्याचे स्पष्ट झाले होते. शारदा हे मयत रमेश नायरच्या पत्नीचे नाव होते. शवविच्छेदनात त्याच्या छातीवर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याची हत्या का आणि कुणी केली याचा उलगडा होत नव्हता. विरार पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

आणखी वाचा-वसई : प्रियकराचा बदला घेण्यासाठी लावला ‘हनी ट्रॅप’, अपहरण करून मागितली १ लाखांची खंडणी

…पत्नीची छेड काढल्याने केली हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात मयत गोविंद खानिया या त्याच्या मित्रावर संशय आला. मयत रमेश नायर (४८) आणि गोविंद कुमर खानिया हे दोघे मित्र होते. मात्र रमेश गोविंदच्या बायकोवर एकतर्फी प्रेम करत होता. वारंवार तो तिची छेड काढत होता. त्यामुळे गोविंदने मयर नायर याला डोंगरावर नेले आणि त्याला मारहाण करून त्याची हत्या केली. आम्ही आरोपी गोविंद खानिया याला अटक केली असून त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केली असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.