वसई– मागील दोन दिवसांपासून विरारमधून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा (७०) या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे. बुधवारी पावसामुळे चिंचेचे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस कुणाला त्याबाबत समजले नाही.

मंजुळा झा (७०) ही महिला काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर येथील ऋषभ टॉवरमध्ये आपल्या मुलाकडे आली होती. सकाळी नातवाला शाळेत सोडून ती मंदिरात जात असे. मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरातून फुले तोडून आणत असे. बुधवार १९ जून रोजी ती नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी बाहेर गेली आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू होता. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींज येथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड पडलेले दिसले. तेथे शोध घेत असता दुर्गंधी आली. तेव्हा झाड बाजूला केले असता मंजुळा झा यांचा मृतदेह आढळून आला.

Human Rights Commission, Virar police, rupess ten lakh compensation, victim family, youth suicide case
विरार पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, १० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे मानवाधिकार आयोगाचे आदेश
young women Aarti Yadav was brutally murdered by her boyfrind in vasai
शहरबात : ही वसई आमची नाही…
bhaindar municipal corporation marathi news
भाईंदर: पालिकेच्या प्रकल्पातील खड्ड्यात मुलाचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
Hidden room found in the basement of Ghodbunder Fort
घोडबंदर किल्याच्या तळघरात सापडली छुपी खोली;  राज्य पुरातत्व विभागाकडून पाहणी
57 year old woman dies as bike hits a pothole in virar
विरार मध्ये खड्ड्याने घेतला महिलेचा बळी
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
vasai aarti yadav murder case
आरती यादव हत्या प्रकरण: हत्येचे चित्रण करणार्‍या १४ जणांचे नोंदविले जबाब
vasai marathi news
वसई: लग्न जुळत नसल्याने तरूणीची आत्महत्या

हेही वाचा – भाईंदर : पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया आणखी दोन दिवस स्थगित

हेही वाचा – विरार: जावयाने केली सासूची हत्या

बुधवारी सकाळी वादळी पावासमुळे हे झाड पडले होते. आम्ही एनडीआरएफच्या मदतीने झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते. मात्र झाडाच्या प्रचंड फांद्या असल्याने महिला दिसून आली नाही. स्थानिकांनीही झाडाखाली कुणी नसावे असे सांगितले होते, अशी माहिती वसई विरार अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.