वसई : नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परिसरात बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नीरज कुमार जयस्वाल (२८) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७.३० सुमारास घडली.नीरज हा नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परिसरात राहत असून शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघाला होता. यावेळी रस्ता ओलांडून जाताना त्याला भर धाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत तो बसचा पुढील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदना पाठविण्यात आला आहे.या घटनेनंतर बस चालक फरार झाला असून बस चालकाच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सद्यस्थितीत पोलिसांनी बस जप्त केली असून फरार चालकाचा शोध चालू असल्याचे सांगितले आहे.या घडलेल्या अपघातामुळे नागरिकांनी वाहनचालकांच्या बेदरकारपणावर प्रश्न उपस्थित केला आहे.