वसई- नालासोपारा येथील एका तरुणाने कर्ज वसुली करणार्‍या एजंटच्या त्रासमुळे स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे उघडीस आले आहे. गुन्हे शाखा २ च्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे राहणार्‍या अनुप विश्वकर्मा (२८) या तरुणाने सोमवारी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी अनुपच्या कुटुंबियांकडून १ लाखांची मागणी केली होती. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे शाखा २ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करून अनुपच्या मोबाईलचा ठावठिकाणा (लोकेशन) काढले. ते दादर रेल्वे स्थानक परिसरात दाखविण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने दादर रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढला आणि तेथून अनुपला ताब्यात घेतले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – न्यायालयाच्या निकालापूर्वीच अधिसूचना, २९ गावे वसई विरार महापालिकेत समाविष्ट

त्याचे कुणी अपहरण केले? कुठे ठेवले होते? याबाबत त्याला समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीत त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. अनुप याने दोन वर्षांपूर्वी एका खासगी वित्तीय संस्थेकडून ९४ हजारांचे कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते थकल्याने वसुली एजंट त्याच्या मागे लागले होते. वसुली एजंटकडून त्याला वारंवार धमक्या मिळत होत्या. त्यामुळे त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता असे गुन्हे शाखा २ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ चे प्रमुख शाहुराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे,सागर प्रकाश शिंदे आदींच्या पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले.

हेही वाचा – न्यायालयाच्या निकालापूर्वीच अधिसूचना, २९ गावे वसई विरार महापालिकेत समाविष्ट

दुचाकी दुरूस्तीसाठी रचला होता स्वत:च्या अपहरणाचा बनाव

दोन महिन्यांपूर्वी असाच एक प्रकार वसईत उघडकीस आला होता. वसईच्या फादरवाडी येथे राहणार्‍या अंकीत यादव (२०) या तरुणाने देखील स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता. ७ डिसेंबर २०२३ रोजी तो घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर वडील नन्हेलाल यादव यांना फोन करून तीन अनोळखी इसमांनी अपहरण केल्याचे सांगितले. अपहरकर्त्यांनी अज्ञातस्थळी ठेवले असून खूप मारहाण करत असल्याचे सांगितले होते. अपहरणकर्त्यांंनी अंकितच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून त्याच्या वडिलांना एक क्यूआर कोड पाठवला होता. त्यावर ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितले होते. ते न पाठविल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केल्यानंतर अंकितने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघडकीस आले होते. अंकितच्या दुचाकीच्या दुरूस्तीसाठी ३० हजारांचा खर्च होता. पंरतु त्याचे वडील त्याला पैसे देत नव्हते. त्यामुळे त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता.

Story img Loader