‘वास्तुरंग’ पुरवणीतील प्रसाद मोकाशी यांचा ‘कॉलनीची पन्नाशी’ हा लेख वाचला. अत्यंत अभ्यासपूर्ण असा सुंदर लेख आहे.

कॉलनी आपले आत्मकथन सांगते, कल्पना सुंदर आहे. आम्ही बिल्डिंग नं. १४० मध्ये १९७२ ला रहायला आलो. म्हाडाच्या १५५ इमारतींमधील आमची बिल्डिंग. बििल्डगच्या मागे लांबवर फक्त खाडी पसरली होती. त्यावर भराव टाकून कुर्ला डेअरी उभी राहिली. १९७५ साली त्याचे उद्घाटन तत्कालीन संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांच्या हस्ते झाले.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

अनेक राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे नेहरू नगरने पाहिली. २००५चा महापूर तर कायम स्मरणात राहील. आमच्या घरात ४ फूट पाणी शिरले. २ दिवस आम्ही २ऱ्या मजल्यावरील अजय क्षीरसागर यांच्या घरात राहिलो. प्रचंड माणुसकीचा ओलावा अनुभवला.

जिच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, लहानाचे मोठे झालो तिच्या पन्नाशीत मीही कधी पन्नाशी पार केली हे कळले नाही.

कॉलनीचे ऋण माझ्यावर कायम असतील. कॉलनी शतायुषी नव्हे तर चिरंजीव राहो, ही ईश्वराकडे प्रार्थना!

राजदीपक अळेकर

 

वाचनीय पाटा-वरवंटा

मोहन गद्रे यांचा ‘पाटा-वरवंटा’ हा लेख उद्बोधक आहे. पाटा-वरवंटा हे प्राग् ऐतिहासिक साधन आहे. याचे दोन प्रकार असत. आपण पाहतो तो सपाट पाटा व त्यावर फिरवता येईल असा वरवंटा.

दुसरा प्रकार पूर्वी असे. त्यात पाटय़ाचा मधील भाग खोलगट असे व त्यात बसेल असा वरवंटा बनवीत. याचा उपयोग धान्याचे पीठ करण्यासाठी करीत. (हे जात्याचा शोध लागण्यापूर्वी असेल) त्यानुसार वरवंटा धरण्याचे दोन प्रकार- एक वरून व दुसरा बाजूने- आजही समाजात दिसतात.

ही माहिती जयंत गडकरी यांनी भाषांतर केलेल्या प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘प्राचीन भारतीय समाज-संस्कृती संवर्धन’ या ग्रंथात मिळाली. दक्षिणेत वापरात असलेला दगडी रगडा हे पाटा- वरवंटय़ाचे प्रगत रूप मानायला हवे.

बाळाच्या नामकरण विधीतही वरवंटय़ाचे स्थान सर्वविदित आहेच.

प्रकाश गोखले