News Flash

घरसजावटीतील नवीन ट्रेंड्स

सौंदर्याच्या किंवा रंगसंगती बाबत आपल्या मनात एक विशिष्ट ठोकताळे असतात.

सध्याचा काळ हा स्पेशलायजेशनचा काळ आहे. आपल्या विविध रोगांवरील उपचारांपासून ते रोजच्या जीवनातील अन्न, कपडे अशा सर्व स्तरावर स्पेशलायजेशन आढळत असते. मग गृह सजावटीचे क्षेत्रदेखील यांपासून कसे मागे राहील? या सजावटीमध्ये फक्त फíनचरचाच वापर होत नसतो, तर रंग, पडदे, उशा-चादरी अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा यात समावेश होत असतो. या तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी मिळविण्यासाठी देखील कित्येक दुकाने पालथी घालावी लागतात. गृह सजावटीमधील बदलते ट्रेण्डस्, नवनवीन संकल्पना, फॅशन या सर्व गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी मिळावी. आणि तिथून ती या क्षेत्रातील व्यावसायिकांबरोबरच गिऱ्हाईकांपर्यंत देखील पोहचवावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या डिझाइन क्षेत्रातील साहम आणि परमानटीअर या ब्रॅण्डनी मिळून एचजीएच इंडिया २०१७ या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यात होम डेकोर, टेक्सटाइल्स, गृह सजावटीच्या वस्तू आणि भेट वस्तू या सर्व गोष्टींचा समावेश केला होता. अ‍ॅक्रॉस टाइम्स ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना होती. या संकल्पनेअंतर्गत भूत, वर्तमान काळातील ट्रेण्डस् बरोबरच भविष्यातील गरजांचादेखील विचार करण्यात आला.

निसर्गसौंदर्याचा खरा प्रेरणास्रोत

सौंदर्याच्या किंवा रंगसंगती बाबत आपल्या मनात एक विशिष्ट ठोकताळे असतात. आणि त्या नियमांना अनुसरूनच आपण सौंदर्य शोधत असतो. परंतु निसर्गाचे मात्र तसे नसते. तिथे क्षणोक्षणी इतके विपुल आविष्कार बघायला मिळतात की, ते पाहूनदेखील मनाला एकप्रकारची प्रसन्नता लाभते. आता हेच बघा ना, एखाद्या खोलीत मोठमोठय़ा आकाराच्या पानांची किंवा गडद रंग असलेल्या फुलांची नक्षी असलेले पडदे, चादर अथवा उशांनी सजावट केली असेल, तर तिथे वावरताना आपल्या मनालादेखील एक प्रकारची प्रसन्नता लाभते. कारण निसर्गाची जादूच तशी असते. एखाद्या गोष्टीची सजावट जितकी सहज आणि नसíगक असेल, तितका तिथला वावर अधिक आल्हाददायी असतो. म्हणूनच, खोलीत असलेल्या एखाद्या छोटय़ाशा रोपटय़ामुळे किंवा फुलामुळे तिथल्या वातावरणाला एक वेगळीच नजाकत प्राप्त होते. शिवाय मनावरील ताणदेखील हलका होण्यास मदत होते.

पारंपरिक वारसाचे जतन

जागतिक पातळीवर बदलत्या ट्रेण्डसचा आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षांने जाणविते की, सध्या घर सजावटीमध्ये पारंपरिकतेवर अधिक भर दिला जात आहे. आणि या पारंपरिकतेच्या बाबतीत आपला देश अधिक श्रीमंत आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. नुसत्या पारंपरिक हस्तकला जरी विचारात घेतल्या तरी त्यात विणकाम, भरतकाम, लोकरीचे काम, कशिदाकारी, लाकडावरील कोरीव काम, बांबूकाम आणि धातूवरील नक्षीकाम असे असंख्य सजावटीचे प्रकार आढळतात. टेक्शचर स्वरूपातील वॉलपेपर आणि लाकडी फíनचर या आधुनिक व पारंपरिकतेच्या सजावटीमुळे त्या घराला एक प्रकारचा खानदानी श्रीमंतपणा लाभतो.

आधुनिकता व पारंपरिकतेचा मिलाफ

उत्तम गृह सजावट हा मानवी इच्छा-आकांक्षाचा आविष्कार असतो. अलीकडच्या जीवनशैलीचा विचार केला तर आधुनिकतेला पारंपरिक वातावरणाची जोड लाभली तर ती सजावट मनाला खूपच भावते. शिवाय, आधुनिकतेच्या काळातदेखील आजही आपली नाळ निसर्गाशी तितकीच जोडली गेली आहे, याचा आनंद काही औरच असतो. भूगर्भात घडणाऱ्या विविध भौगोलिक गोष्टी, या गृहसजावटीमध्ये नवीन संकल्पना निर्माण करण्यास तितक्याच कारणीभूत ठरतात. जसे, वाळूवरील बदल, निरनिराळ्या आकाराचे दगड यामुळे वेगवेगळ्या डिझाइन्समधील कारपेटस्, वॉलपेपर पाहायला मिळतात. या गोष्टीचा प्रत्यक्ष सजावटीमध्ये जेव्हा वापर होतो तेव्हा तोच नॅचरल फिल (नसíगकता) घरबसल्या आपण अनुभवू शकतो.

डिजीटल तंत्रज्ञानाचा नेमका वापर 

पारंपरिकतेची सांगड जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर घातली जाते तेव्हा त्यातील सौंदर्य खऱ्या अर्थाने बहरून येते. आता हेच पहा ना, अमुक एका खोलीत आपल्या मनातील दोन रंगांची संगती कशी दिसेल, हे हल्ली सहजपणे संगणकावर पाहता येते. यामुळे वेळेची बचत तर होतेच. शिवाय नेमका निर्णय घेणेदेखील सहजसोपे होते. मग त्यालाच पडदे, चादरी-उशांची नेमकी कोणती सजावट शोभून दिसेल, याचादेखील अंदाज येतो. शिवाय आपल्या कल्पनेतील सजावट संगणकावर प्रत्यक्ष पाहता आल्यामुळे त्यातील उणिवांचा नेमका अंदाज येतो. त्यात काय बदल करता येईल, हेदेखील सहज समजते. या तंत्रज्ञानामुळे तरुणवर्ग देखील सजावटीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे.

अ‍ॅक्रॉस टाइम या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना इंडो काउंटचे व्यवस्थापकीय संचालक असलेले असीम दलाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत कोणकोणते नवीन ट्रेण्डस् येऊ घातले आहे, याची माहिती मिळते. त्या आधारे आम्ही आमच्या डिझाइन्समध्ये, रंगांमध्ये आणि पॅटर्नमध्ये आवश्यक ते बदल करीत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:15 am

Web Title: new trends in home decoration home decor
Next Stories
1 घर खरेदी करताना..
2 मैत्र.. : स्वयंपाक घराशी!
3 सध्यातरी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमीच!